advertisement

Kids Screen Time : मुलांची मोबाईल पाहण्याची सवय 2 दिवसांत मोडेल! स्क्रीनऐवजी मुलांना द्या घरातल्या 'या' वस्तू..

Last Updated:

How to reduce kids screen time : आता लहान मुलं आणि वृद्धांनाही मोबाईलची खूप सवय लागत आहे. त्यातही लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं जास्त कठीण आहे. पण आज आम्ही तुम्हाला मुलांना मोबइलपासून दूर ठेवण्याच्या काही सोप्या युक्त्या सांगत आहोत.

मुलांना मोबाईलपासून कसे दूर ठेवावे?
मुलांना मोबाईलपासून कसे दूर ठेवावे?
मुंबई : हल्ली मोबाइलपासून कोणालाही दूर ठेवणं अगदी अशक्य गोष्ट होत चालली आहे. तरुणांना तर मोबाईलचं वेड आहेच. पण आता लहान मुलं आणि वृद्धांनाही मोबाईलची खूप सवय लागत आहे. त्यातही लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं जास्त कठीण आहे. पण आज आम्ही तुम्हाला मुलांना मोबइलपासून दूर ठेवण्याच्या काही सोप्या युक्त्या सांगत आहोत.
मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी ughad.ughad या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही टिप्स दिल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये मुलांना मोबाइलऐवजी काही वस्तू देऊन तुम्ही त्यांचा स्क्रीन टाईम कमी करू शकता.
या पद्धतीने मुलांना ठेवा मोबाइलपासून दूर..
गोष्टी ऐकवणे : मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी हा एक ऊत्तम उपाय आहे. मात्र गोष्टी त्यांना प्रत्येकवेळी आपणच ऐकवू शकत नाही. अशावेळी मुलांना रेडिओ, टेप रेकॉर्डर किंवा इतर ऑडिओ अप्स आणि डिव्हाइसेस वापरून तुम्ही मुलांना गोष्टी ऐकवू शकता. यामध्येही मूळ रमतात.
advertisement
घरगुती गेम्स : मुलांना तुम्ही घरातही अनेक गेम्स खेळवू शकता. घरातल्या घरात भांडी खेळायला लावा, मुलांना पाण्यामध्ये खेळू द्या किंवा लोकरीशी खेळू द्या. असे अनेक गेम्स तुम्ही सोशल मिडीआयवर पाहूनही मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त करू शकता.
माईंडफुल गेम्स : मुलं जरा मोठी असतील तर त्यांना तुम्ही काही माईंडफुल गेम्स आणून देऊ शकता, ज्यामध्ये ते रामतील. जसे की, ब्लॉक्स किंवा पझल सोडवणे असे नाके गेम्स तुम्ही मुलांना खेळायला देऊ शकता.
advertisement
मैदानी खेळ : ही गोष्ट तर केवळ स्क्रीन टाईम कमी करण्यासाठीच नाही तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. मुलांची फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी झालीच पाहिजे. य्यासाठी त्यांना मैदानावर खेळायला न्या, त्यांना पळू द्या. पडले तर पडू द्या. पण त्यांना मैदानावर खेळू द्या.
मातीशी खेळणे : मुलांनाही मातीशी खेळायला आवडतंच. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मुलांनी मातीशी खेळणंही फायद्याचं असतं. कारण जेव्हा मातीशी जेव्हा मुलांचा संपर्क येतो, तेव्हा त्यांचे न्यूरॉन्स डेव्हलप होतात. ते त्यांच्यासाठी भविष्यातही खूप फायदेशीर ठरते.
advertisement
advertisement
या सर्व अ‍ॅक्टिव्हिटीज केल्याने मुलं साहजिकच थकतील आणि मग थकल्यामुळे ते पोटभर जेवण करतात. त्यानंतर त्यांना व्यवस्थित आणि शांत झोपही लागते. अशाप्रकारे तुम्ही मुलांना मोबाइलपासून दूर ठेऊ शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kids Screen Time : मुलांची मोबाईल पाहण्याची सवय 2 दिवसांत मोडेल! स्क्रीनऐवजी मुलांना द्या घरातल्या 'या' वस्तू..
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement