6,6,6,6,4,6,6.... 14 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi ने ऑस्ट्रेलियाला रचला इतिहास, ठोकलं खणखणीत शतक!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
AUS U-19 vs IND U-19 Youth Test : इंडिया अंडर-19 टीमसाठी खेळताना वैभवने बुधवारी 86 बॉल्समध्ये एकूण 113 रन्सची आक्रमक इनिंग खेळली.
Vaibhav Suryavanshi Test Century : भारताचा युवा बॅट्समन वैभव सूर्यवंशीचा तुफान फॉर्म ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही कायम आहे. वनडेमध्ये दमदार खेळ दाखवल्यानंतर आता त्याने यूथ टेस्टमध्येही आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. आक्रमक खेळीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीने शतक ठोकलं अन् सर्वांनाच चकित केलं आहे. ब्रिस्बेन येथील इयान हीली ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या यूथ टेस्ट मॅचमध्ये वैभवने एक शानदार शतक झळकावत अनेक मोठे विक्रम मोडले आहेत.
86 बॉल्समध्ये 113 रन्सची खेळी
युवा बॅट्समनसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा नेहमीच कठीण मानला जातो, पण वैभव सूर्यवंशीने हा दौरा एकदम सोपा करून दाखवला आहे. वैभवने केवळ रन्स केले नाहीत, तर त्याने वेगाने स्कोरबोर्ड पुढे नेला. इंडिया अंडर-19 टीमसाठी खेळताना वैभवने बुधवारी 86 बॉल्समध्ये एकूण 113 रन्सची आक्रमक इनिंग खेळली. हेडन सिलरच्या बॉलवर तो बाद झाला, पण पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी त्याने 8 फोर आणि 7 सिक्स लगावत कंगारू बॉलर्सची जोरदार धुलाई केली.
advertisement
HUNDRED FOR VAIBHAV SURYAVANSHI AT THE AGE OF 14 IN AUSTRALIA
- Suryavanshi smashed a spectacular Hundred against Australia U-19 in Australia, the future star doing the magic in all formats.
Hundred from just 78 balls at Ian Healy Oval, Historic. pic.twitter.com/jFnutdhDZQ
— Johns. (@CricCrazyJohns) October 1, 2025
advertisement
78 बॉल्समधील सर्वात जलद शतक
वैभव सूर्यवंशीच्या या दमदार इनिंगमुळे एक मोठा विक्रम मोडला आहे. त्याने केलेला 78 बॉल्समधील शतक हे युथ टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरचा सर्वात जलद शतक ठरलं आहे. इतकेच नाही, तर 100 पेक्षा कमी बॉल्समध्ये दोन युथ टेस्ट शतक झळकावणारा तो न्यूझीलंडचा महान बॅट्समन ब्रेंडन मॅक्युलम याच्यानंतरचा पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी 2024 मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्ध 58 बॉल्समध्ये शतक केले होते.
advertisement
जगातील सर्वात कमी वयाचा खेळाडू
विशेष म्हणजे, 14 वर्षांच्या वयात ही कामगिरी करणारा तो जगातील सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 14 वर्षांच्या वयात त्याने 35 बॉल्समध्ये आयपीएलमध्ये शतक केले होते. युथ टेस्टमध्ये भारतासाठी सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीतही वैभवने आता पहिला क्रमांक मिळवला आहे. आपल्या या शानदार इनिंगमध्ये 8 सिक्स मारून त्याने कॅप्टन आयुष म्हात्रेचा जुना विक्रम सहज मोडला. वैभवच्या नावावर आता युथ टेस्टमध्ये एकूण 15 सिक्सची नोंद झाली आहे. त्याने अलीकडेच ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्धच्या दुसऱ्या युथ वनडेमध्ये उन्मुक्त चंदचा सर्वाधिक सिक्स 38 मारण्याचा विक्रमही मोडला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 10:21 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
6,6,6,6,4,6,6.... 14 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi ने ऑस्ट्रेलियाला रचला इतिहास, ठोकलं खणखणीत शतक!