एलन मस्कने Netflixची वाट लावली, एका झटक्यात 2 लाख कोटींचा तोटा; काय केले हे वाचून सगळेच घाबरले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Elon Musk vs Netflix: एलन मस्कच्या एका ट्वीटने नेटफ्लिक्सला झटका बसला आणि कंपनीच्या बाजारमूल्यात तब्बल 2 लाख कोटी रुपयांची धूळधाण उडाली.“नेटफ्लिक्स रद्द करा” या मस्कच्या आवाहनानंतर गुंतवणूकदारांनी घाबरून शेअर्सची विक्री सुरु केली.
मुंबई: नेटफ्लिक्सला अलीकडेच असा जबरदस्त धक्का बसला की कंपनीच्या बाजारमूल्यातून तब्बल २ लाख कोटी रुपये उडून गेले. आणि या घसरणीमागे कारण ठरला एकच व्यक्ती- एलन मस्क (Elon Musk).
मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर आपल्या फॉलोअर्सना नेटफ्लिक्सचे सब्स्क्रिप्शन रद्द करण्याचे आवाहन केले आणि पाहता पाहता कंपनीचे शेअर्स कोसळू लागले.
advertisement
रिपोर्ट्सनुसार 27 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सची मार्केट व्हॅल्यू सुमारे 514 अब्ज डॉलर्स होती. जी 3 ऑक्टोबरपर्यंत घटून 489 अब्ज डॉलर्सवर आली. म्हणजेच सुमारे 25 अब्ज डॉलर्सचा, म्हणजे जवळपास 2 लाख कोटी रुपयांचा तोटा.
advertisement
मस्कच्या ट्वीटनंतर काही मिनिटांतच कंपनीच्या मार्केट कॅपमधून तब्बल 7 अब्ज डॉलर्सची किंमत साफ झाली. याहू फायनान्स (Yahoo Finance) च्या माहितीनुसार, शुक्रवारी नेटफ्लिक्सच्या शेअर्समध्ये एप्रिलनंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण झाली. मस्कच्या अपीलचा थेट परिणाम म्हणजे मागील पाच ट्रेडिंग दिवसांत नेटफ्लिक्सचे शेअर्स जवळपास 5 टक्क्यांनी घसरले, तर दुसरीकडे अॅमेझॉन (Amazon) आणि मेटा (Meta) सारख्या इतर टेक कंपन्यांचे शेअर्स वाढले.
advertisement
विशेष बाब म्हणजे जिथे नॅस्डॅक इंडेक्स 2 टक्क्यांनी वाढला, तिथे नेटफ्लिक्स मात्र सतत खाली घसरतच राहिला. गुरुवारी देखील कंपनीचा शेअर 1.2 टक्क्यांनी घसरून 1,161 डॉलर्सवर बंद झाला. विश्लेषकांचे मत आहे की, ही घसरण थेट मस्कच्या ट्वीट्सनंतरच सुरू झाली आणि तिला दुर्लक्ष करणे कठीण आहे.
advertisement
एलन मस्कने नेमके काय म्हटले होते?
एलन मस्कने 1 ऑक्टोबर रोजी ट्वीट केले होते –
“Cancel Netflix for the health of your kids.” (“तुमच्या मुलांच्या भल्यासाठी नेटफ्लिक्स रद्द करा.”)
यासोबतच मस्कने अशा अनेक पोस्ट्स री-शेअर केल्या ज्यामध्ये नेटफ्लिक्सवर ट्रान्सजेंडर थीम्स आणि ‘वोक अजेंडा’ला प्रोत्साहन देण्याचे आरोप करण्यात आले होते.
advertisement
हा संपूर्ण वाद ‘Dead End: Paranormal Park’ या अॅनिमेटेड सिरीजबाबत आहे. जी नेटफ्लिक्सने 2023 मध्ये रद्द केली होती. या सिरीजचे डायरेक्टर हॅमिश स्टील (Hamish Steele) यांच्यावर मस्क आणि काही कंझर्व्हेटिव्ह वापरकर्त्यांनी आरोप केले की त्यांनी राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर एकतर्फी भूमिका घेतली.
advertisement
नेटफ्लिक्सची प्रतिक्रिया आणि वाढता वाद
वाद वाढताच हॅमिश स्टील यांनी ब्लूस्काय (Bluesky) वर लिहिले की, त्यांना सोशल मीडियावर मिळणाऱ्या द्वेषपूर्ण आणि ज्यूविरोधी टिप्पण्यांमुळे भीती वाटते, पण तरीही ते आपल्या समर्थकांचे आभारी आहेत. मात्र नेटफ्लिक्स कंपनीकडून या वादावर कोणतेही औपचारिक विधान आलेले नाही.
दरम्यान विश्लेषक म्हणतात की- नेटफ्लिक्सच्या शेअरची घसरण फक्त मस्कच्या ट्वीट्समुळे नाही, तर निवेशकांच्या भावनांवर झालेल्या परिणामामुळे आहे.
कमाई आणि पुढील दिशा
नेटफ्लिक्स आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल 21 ऑक्टोबर रोजी जाहीर करणार आहे.मागील तिमाहीत कंपनीने वॉल स्ट्रीटच्या अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले होते.
या वेळी कंपनीचा रेव्हेन्यू 11.53 अब्ज डॉलर्स, तर प्रति शेअर नफा (EPS) 6.87 डॉलर्स राहील, असा अंदाज आहे. कंपनीने वार्षिक रेव्हेन्यूचे लक्ष्य 44.8 ते 45.2 अब्ज डॉलर्स दरम्यान ठेवले आहे आणि अपेक्षा आहे की 2026 पर्यंत जाहिरातीतून मिळणारा महसूल 3 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 7:04 AM IST
मराठी बातम्या/मनी/
एलन मस्कने Netflixची वाट लावली, एका झटक्यात 2 लाख कोटींचा तोटा; काय केले हे वाचून सगळेच घाबरले