गायिका मैथिली ठाकूरच्या हातात BJPचं कमळ, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार! भाजप नेत्यांच्या भेटीदरम्यान काय घडलं?

Last Updated:

Singer Maithili Thakur Entry in Politics : मैथिली ठाकूर हिने गेली अनेक वर्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गाण्यानं जनतेचा मंत्रमुग्ध केलं. आता ती भाजपचं कमळ हातात घेणार आहे. राजकीय प्रवेशाबाबत मैथिली काय म्हणाली पाहूयात.

News18
News18
मुंबई : पुढील महिन्यात बिहार विधानसभा निवडणुका होत आहेत. निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर यांनी भाजपचे निवडणूक प्रभारी विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली. या हाय-प्रोफाइल भेटीमुळे मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या अफवांना बळकटी मिळाली आहे. यावर मैथिली काय म्हणाली आहे पाहूयात.
रविवारी भाजप नेते विनोद तावडे यांनी ट्विटरवर मैथिली ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबासोबतच्या भेटीचे फोटो शेअर केला. ज्यामुळे मैथिली ठाकूर विधानसभा निवडणूक लढवत असल्याच्या अफवांना वेग आला. त्यांच्या पोस्टमध्ये तावडे म्हणाले की, "1995 मध्ये बिहारमध्ये लालू प्रसाद यादव सत्तेत आल्यानंतर जे कुटुंब बिहार सोडून गेले होते, त्या कुटुंबातील कन्या आणि सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकुर आता बदलत्या बिहारचा वेग पाहून पुन्हा बिहारमध्ये परत यायची इच्छा व्यक्त करत आहेत."
advertisement
आज गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि मी त्यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की, बिहारच्या जनतेसाठी आणि बिहारच्या विकासासाठी त्यांचं योगदान अपेक्षित आहे. बिहारचा सामान्य नागरिक त्यांच्या या योगदानाची अपेक्षा करतो आणि त्या नक्कीच ही अपेक्षा पूर्ण करतील, असा आम्हाला विश्वास आहे.
advertisement
advertisement
त्यांनी सांगितले की त्यांनी आणि नित्यानंद राय यांनी गायिकेला लोकांच्या आणि बिहार राज्याच्या विकासासाठी असलेली त्यांची वचनबद्धता पूर्ण करण्याचे आवाहन केले. विनोद तावडे यांची पोस्ट पुन्हा शेअर करताना मैथिली ठाकूर यांनी लिहिले, "जे लोक बिहारसाठी मोठी स्वप्नं पाहतात त्यांच्यासोबत झालेली प्रत्येक चर्चा मला दूरदृष्टी आणि सेवाभावाची ताकद आठवून देते. मनःपूर्वक आदर आणि कृतज्ञता व्यक्त करते. श्री नित्यानंद राय जी आणि श्री विनोद श्रीधर तावडे जी
advertisement

मैथिली ठाकूर कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

निवडणूक लढवण्याच्या चर्चांना उत्तर देत मैथिली ठाकूर म्हणाली की, "मीही या गोष्टी टीव्हीवर पाहत आहे. अलीकडेच मी बिहारला भेट दिली. तिथे मी नित्यानंद राय तसेच विनोद तावडे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. आम्ही बिहारच्या भविष्यासंदर्भात चर्चा केली. सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण पाहू या पुढे काय होतं. मला माझ्या गावच्या मतदारसंघातून उभं राहायला आवडेल, कारण माझं त्या ठिकाणाशी भावनिक नातं आहे."
advertisement
advertisement
बिहार निवडणुकांमध्ये ती कोणाला पाठिंबा देत आहे या प्रश्नावर म्हणाली, "या विषयी मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही. पण देशाच्या विकासासाठी शक्य तितकं योगदान देण्यासाठी मी ठामपणे उभी आहे."
मराठी बातम्या/मनोरंजन/
गायिका मैथिली ठाकूरच्या हातात BJPचं कमळ, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार! भाजप नेत्यांच्या भेटीदरम्यान काय घडलं?
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement