Renuka Shahane : घटस्फोटित रेणुका शहाणेंच्या प्रेमात कसे पडले आशुतोष राणा? फिल्मी आहे Love Story
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Renuka Shahane : बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे रेणुका शहाणे. गोड हास्य, साधेपणा आणि संस्कारी प्रतिमेमुळे रेणुका आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान टिकवून आहेत.
advertisement
advertisement
यानंतर त्यांच्या आयुष्यात आले अभिनेता आशुतोष राणा. दोघांची पहिली भेट दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ‘जयते’ चित्रपटाच्या सेटवर झाली. पहिल्याच भेटीत आशुतोष रेणुका यांच्या प्रेमात पडले. रेणुका शहाणे यांना आशुतोष राणा यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती, पण आशुतोष राणा हे रेणुका यांचे मोठे चाहते होते. पहिल्याच भेटीत त्यांनी रेणुकांना सांगितले की, "मी तुमचा खूप मोठा चाहता आहे."
advertisement
advertisement
आशुतोष राणा यांनी रेणुकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या अन्सरिंग मशीनवर एक लांबलचक संदेश (message) सोडला, ज्यामध्ये त्यांनी आपला नंबर दिला नाही. रेणुकांना हा संदेश इतका आवडला की त्यांनी स्वतः आशुतोष यांना संपर्क केला. येथून दोघांमध्ये बोलणे सुरु झाले. सुमारे तीन महिने त्यांनी फक्त फोनवर (long-distance calls) गप्पा मारल्या. या काळात ते एकमेकांना तासन्तास ओळखू लागले.
advertisement
advertisement