बुलेटपेक्षा मजबूत आणि पॉवरफुल Bike झाली स्वस्त, GST 2.0 पेक्षा आंतरराष्ट्रीय कंपनीनेच किंमत केली कमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
आंतराष्ट्रीय मार्केटमध्ये आपला दबदबा राखणाऱ्या Triumph Motorcycles कंपनीने आपल्या लोकप्रिय Speed 400 बाईकची किंमत कमी केली आहे.
केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर ऑटो इंडस्ट्रीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारपासून ते दुचाकीपर्यंत सर्वच वाहनांच्या किंमतीत कपात झाली आहे. त्यातच सण उत्सवाचा काळ असल्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशातच आंतराष्ट्रीय मार्केटमध्ये आपला दबदबा राखणाऱ्या Triumph Motorcycles कंपनीने आपल्या लोकप्रिय Speed 400 बाईकची किंमत कमी केली आहे. ही बाईक आता २ लाखांच्या आत येणार आहे. त्यामुळे जर बुलेट घेण्याचा प्लॅन असेल तर Triumph ची बाईक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.
केंद्र सरकारने लागू केलेल्या GST २.० मुळे 350 cc पेक्षा कमी असलेल्या बाईकच्या किंमतीत कमी झाल्या आहे. पण दुसरीकडे. Triumph ने भारतात आपल्या Speed 400 आणि Triumph Speed T4 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. जवळपास 16,797 रुपयांपर्यंत किंमत कमी केली आहे. Triumphने जीएसटी 2.0 (GST 2.0) लागू झाल्यानंतर वाढलेल्या किंमतीचा भार स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला होता. आता या नवीन फेस्टिव्ह ऑफरमुळे, या दोन्ही मोटरसायकली भारतीय ग्राहकांसाठी अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आहेत. हा निर्णय बाजारात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचचलं आहे.
advertisement
काय आहे कंपनीची ऑफर?
Triumph ने ग्राहकांना स्पीड 400 वर सर्वात मोठी सूट दिली आहे. Triumph स्पीड टी4 ची पूर्वीची एक्स-शोरूम किंमत 2,06,539 होती, त्यात आता 14,199 ची कपात केली आहे. त्यामुळे या बाइकची किंमत आता 1,92,539 झाली आहे. त्याचप्रमाणे, ट्रायम्फ स्पीड 400 ची जुनी किंमत 2,50,551 होती. यावर जास्तीत जास्त 16,797 ची कपात केली आहे. त्यामुळे या बाइकची किंमत आता 2,33,754 झाली आहे.
advertisement

Triumph स्पीड 400 ही 2023 मध्ये लाँच झाली होती, तेव्हा तिची सुरुवातीची किंमत 2.23 लाख होती. सध्याच्या सणासुदीच्या सवलतीनंतर, मोटरसायकलची नवीन किंमत तिच्या मूळ लाँच किमतीपेक्षा फक्त 10,000 ने अधिक आहे. या कपातीमुळे ही ४०० सीसी क्षमतेची बाइक तिच्या लाँच किमतीच्या खूप जवळ आली आहे.
advertisement
इंजिन कसं?
Triumph Speed 400 आणि Speed 400 T4 हे दोन्ही मॉडेल एकाच फ्रेमवर तयार केल्या आहेत. या दोन्हींमध्ये 398 cc चे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे, जे सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे. पण दोन्ही मॉडेल्सच्या इंजिनच्या ट्यूनिंगमध्ये फरक आहे, ज्यामुळे दोन्ही बाईक चालवताना वेगळा अनुभव येतो. प्रीमियम असलेल्या स्पीड 400 ही 39 bhp पॉवर जनरेट करणारी पॉवरफुल बाईक आहे.
advertisement
तर, Triumph Speed 400 T4 मध्ये हे इंजिन 30.6 BHP पॉवर आणि 36 न्यूटन मीटर (Nm) चे पीक टॉर्क निर्माण करतो. ज्या ग्राहकांना आपल्याकडे ४०० सीसी सेगमेंटमध्ये बाईक असावी असं वाटत आहे, त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 11:51 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
बुलेटपेक्षा मजबूत आणि पॉवरफुल Bike झाली स्वस्त, GST 2.0 पेक्षा आंतरराष्ट्रीय कंपनीनेच किंमत केली कमी!


