2 तास 37 मिनिटांची ही अॅक्शन थ्रिलर फिल्म, डोकं सुन्न करणारा क्लायमॅक्स, काळजाचा ठोका चुकवणारा शेवट पाहाच
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Best Action Thriller Film : ओटीटीवर 2 तास 37 मिनिटांची एक जबरदस्त अॅक्शन, थ्रिलर फिल्म आहे. डोकं सुन्न करणारा क्लायमॅक्स आणि काळजाचा ठोका चुकवणारा शेवट प्रत्येकाने पाहाच.
advertisement
सस्पेन्स, अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्या ही धमाकेदार फिल्म एकदा तरी नक्की पाहायला हवी. अ‍ॅक्शनच्या बाबतीत ही फिल्म 'दृश्यम' आणि 'अंधाधुन'ला जबरदस्त टक्कर देते आणि आता ती पुन्हा एकदा चित्रपटगृहांत रिलीज होण्यास सज्ज आहे. या फिल्मने केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत, तर बॉक्स ऑफिसवरही ती सुपरहिट ठरली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
10 जानेवारी 2026 रोजी निर्माता कलाईपुली एस. थानू यांनी X (ट्विटर) वर जाहीर केले की थलापती विजय यांची ‘थेरी’ ही फिल्म पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी सांगितले की अ‍ॅटली दिग्दर्शित ही पॉवर-पॅक्ड एंटरटेनर 15 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहांत रिलीज होईल, जी या चित्रपटाच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त असेल. विजय यांच्या मास एंटरटेनर फिल्मच्या री-रिलीजची ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा त्यांचा शेवटचा चित्रपट ‘जन नायकन’ सर्टिफिकेशनच्या कारणामुळे रिलीज होऊ शकलेला नाही.
advertisement
'थेरी' या फिल्मची कथा वडील-मुलीच्या नात्यावर आधारित आहे. यात थलापती विजय मुख्य भूमिकेत असून, त्यांच्या सोबत सामंथा रुथ प्रभू आणि एमी जॅक्सन हे कलाकारही आहेत. अ‍ॅटली दिग्दर्शित हा चित्रपट DCP विजया कुमार यांच्याभोवती फिरतो. जेव्हा त्यांच्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण होतो, तेव्हा त्यांना पुन्हा त्यांच्या धोकादायक भूतकाळात परतावे लागते. आपल्या लाडक्या मुलीच्या संरक्षणासाठी विजय पुन्हा एकदा शत्रूंशी सामना करण्याची जबाबदारी घेतो. ही तमिळ भाषा फिल्म इतकी लोकप्रिय ठरली की तिचा हिंदीत ‘बेबी जॉन’ या नावाने रीमेक करण्यात आला. या रीमेकमध्ये वरुण धवन, कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जारा जियाना आणि जॅकी श्रॉफ यांनी अभिनय केला आहे. मात्र ब्लॉकबस्टर ‘थेरी’चा हा बॉलिवूड रीमेक ‘बेबी जॉन’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.










