तुमच्या 'या' चुकांमुळे होऊ शकतो राहू-शनीचा प्रकोप, कितीही मेहनत केलात तरी मिळणार नाही यश!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आपण अनेकदा नकळत काही हालचाली करत असतो, जसे की बसल्या बसल्या पाय हलवणे किंवा चालताना पाय ओढत चालणे. वैद्यकीय शास्त्रानुसार याला 'रेस्टलेस लेग्स सिंड्रोम' म्हटले जात असले, तरी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार या सवयी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती बिघडवू शकतात.
Astrology : आपण अनेकदा नकळत काही हालचाली करत असतो, जसे की बसल्या बसल्या पाय हलवणे किंवा चालताना पाय ओढत चालणे. वैद्यकीय शास्त्रानुसार याला 'रेस्टलेस लेग्स सिंड्रोम' म्हटले जात असले, तरी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार या सवयी तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती बिघडवू शकतात. विशेषतः शनी, राहू आणि चंद्राचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यातील सुख-शांती हिरावून घेऊ शकतो.
बसल्या बसल्या पाय हलवणे (चंद्र आणि शनीचा दोष)
अनेक लोकांना खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसल्यावर पाय हलवण्याची सवय असते. ज्योतिषशास्त्रानुसार, पाय हलवल्याने कुंडलीतील चंद्र ग्रह कमकुवत होतो. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे अशा व्यक्ती सतत चिंतेत आणि मानसिक तणावात असतात. तसेच, यामुळे शनीची दृष्टी वक्र होते, ज्यामुळे धनहानी आणि कौटुंबिक कलह वाढतात.
advertisement
पाय घासत चालणे
काही लोक चालताना पायांचा आवाज करतात किंवा पाय ओढत चालतात. सामुद्रिक शास्त्रानुसार, ही सवय राहू आणि शनीला जागृत करते. असे लोक आयुष्यात कितीही मेहनत केली तरी त्यांना योग्य फळ मिळत नाही. पाय ओढत चालणे हे आयुष्यातील संघर्षाचे आणि दुर्दैवाचे लक्षण मानले जाते.
अस्वच्छ पाय आणि फाटलेल्या टाचा
तुमच्या पायांच्या टाचांची स्थिती तुमचे भविष्य दर्शवते. जर तुमच्या टाचा सतत फाटलेल्या आणि अस्वच्छ असतील, तर समजा तुमच्या प्रगतीत अडथळे येणार आहेत. फाटलेल्या टाचा 'बुध' आणि 'शनी' बिघडल्याचे लक्षण आहे. यामुळे घरातील बरकत थांबते आणि लक्ष्मी देवी रुसते. पाय नेहमी स्वच्छ आणि मऊ ठेवण्याचा प्रयत्न करा.
advertisement
बाहेरून आल्यावर पाय न धुता अंथरुणावर जाणे
बाहेरून आल्यावर पाय न धुता थेट बेडवर बसणे किंवा झोपणे हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ आहे. बाहेरची नकारात्मक ऊर्जा आणि राहूचा प्रभाव पायावाटे तुमच्या अंथरुणापर्यंत पोहोचतो. यामुळे वाईट स्वप्ने पडणे, झोप न येणे आणि घरातील सकारात्मकता नष्ट होणे अशा समस्या उद्भवतात.
घरात अनवाणी न चालणे
आजकाल अनेक जण घरातही चप्पल वापरतात. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार दिवसातील काही वेळ घरातील जमिनीवर अनवाणी चालणे आवश्यक आहे. जमिनीच्या संपर्कात आल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि राहूचा दोष कमी होतो. तसेच, आंघोळीनंतर ओल्या पायांनी जमिनीवर चालणे टाळावे, यामुळे नशीब कमकुवत होते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 1:40 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
तुमच्या 'या' चुकांमुळे होऊ शकतो राहू-शनीचा प्रकोप, कितीही मेहनत केलात तरी मिळणार नाही यश!











