मोबाईल ठरला काळ! पिंपरी-चिंचवडमध्ये एका क्षणाचं दुर्लक्ष अन् इंजिनिअरचा रोड रोलरखाली चिरडून अंत
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
रस्ते कामाच्या ठिकाणी रोलर सुरू असताना सहाय्यक अभियंता रोलरच्या अगदी मागे उभा होता. त्याचं पूर्ण लक्ष आपल्या मोबाईल फोनमध्ये होतं.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते कामाच्या ठिकाणी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. मोबाईल फोनच्या वापरामुळे ओढवलेल्या एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे एका सहाय्यक अभियंत्याला आपला जीव गमवावा लागला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अभियंता रस्ते सपाटीकरणाच्या कामाची पाहणी करत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, रस्ते कामाच्या ठिकाणी रोलर सुरू असताना सहाय्यक अभियंता रोलरच्या अगदी मागे उभा होता. त्याचं पूर्ण लक्ष आपल्या मोबाईल फोनमध्ये होतं. त्याचवेळी चालकाने रोलर 'रिव्हर्स' घेतला. मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे अभियंत्याला रोलर मागे येत असल्याचे लक्षात आले नाही.
advertisement
रोलरखाली चिरडून मृत्यू: क्षणार्धात रोड रोलरचे मोठे चाक अभियंत्याच्या अंगावरून गेले. यामध्ये ते चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी किंवा इतर काही कामात असताना मोबाईलचा अतिवापर कशा प्रकारे जीवावर बेतू शकतो, याचे हे भयाण वास्तव समोर आले आहे.
advertisement
या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, सार्वजनिक कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या भयानक अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 1:38 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मोबाईल ठरला काळ! पिंपरी-चिंचवडमध्ये एका क्षणाचं दुर्लक्ष अन् इंजिनिअरचा रोड रोलरखाली चिरडून अंत











