IND vs NZ 1st ODI : घरच्या मैदानावर शुभमन पास! टॉस जिंकून कुणाला दिली संधी? 3 स्पिनर्ससह टीम इंडिया मैदानात, पाहा प्लेइंग इलेव्हन
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs New Zealand : टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला आहे. भारताच्या या 'प्लेइंग 11' मध्ये अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर रन्सची मोठी जबाबदारी असेल.
India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये कोणतेही मोठे बदल झाले नाहीत. टीम इंडियाने दोन ऑलराऊंडर आणि तीन स्पिनर्ससह मैदानात उतरेल. कुलदीप यादवसह टीम इंडिया तीन स्पिनर्ससह मैदानात उतरली आहे. बदोड्यात आता दोन्ही संघांना दम दाखवावा लागेल.
टीम इंडियाची बॅटिंग लाईन अप
टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला आहे. भारताच्या या 'प्लेइंग 11' मध्ये अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर रन्सची मोठी जबाबदारी असेल. मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर आणि विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल हे डावाला आकार देतील. ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन्ही बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
advertisement
फिरकीची धुरा कुणाच्या खांद्यावर?
बॉलिंगचा विचार केला तर भारताकडे मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान बॉलर्स असून त्यांना हर्षित राणा साथ देईल. फिरकीची धुरा कुलदीप यादव आणि जडेजा यांच्या खांद्यावर असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट काढण्यासाठी हे बॉलर्स सज्ज आहेत. तर न्यूझीलंडकडे काईल जेमीसन सारखा अनुभवी बॉलर आणि आदित्य अशोक हा फिरकीपटू आहे, जे भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकू शकतात.
advertisement
नव्या चेहऱ्यांसह न्यूझीलंड मैदानात
न्यूझीलंड संघाने देखील आपला तगडा संघ जाहीर केला असून मायकेल ब्रेसवेल याच्याकडे कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे. पाहुण्या संघाकडून डेव्हन कॉनवे आणि हेन्री निकोल्स डावाची सुरुवात करतील. मिडल ऑर्डरमध्ये डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स हे मोठे सिक्स मारण्यासाठी ओळखले जातात. मिचेल हे याच्याकडे विकेटकीपिंगची जबाबदारी असून, झॅकरी फॉल्क्स आणि ख्रिश्चन क्लार्क यांसारखे तरुण खेळाडू किवी संघाकडून खेळताना दिसणार आहेत.
advertisement
न्यूझीलंड (खेळणारा संघ): डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकॅरी फाउल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, आदित्य अशोक.
भारत (खेळणारा संघ): रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 1:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ 1st ODI : घरच्या मैदानावर शुभमन पास! टॉस जिंकून कुणाला दिली संधी? 3 स्पिनर्ससह टीम इंडिया मैदानात, पाहा प्लेइंग इलेव्हन










