Navi Mumbai : ऑफिसला गेलेली तरुणी अचानक गायब; प्रियंका प्रधान बेपत्ता प्रकरणाने खळबळ

Last Updated:

Navi Mumbai : कोपरखैरणे येथून बेपत्ता एक तरुणी बेपत्ता असून कुटुंबाने तुर्भे पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस तपास करत असून कुणालाही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News18
News18
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर 17 येथून 26 डिसेंबर 2025 रोजी प्रियंका प्रधान (वय 20) ही अचानक बेपत्ता झाली. तिच्या मोठ्या बहिणीन तुर्भे पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिस तपास सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
प्रियंका महापे एमआयडीसीतील एका कंपनीत काम करते. 26 डिसेंबर रोजी ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती परंतु सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही त्यामुळे कुटुंबातील सर्वजण चिंतेत आहेत.
घरच्यांनी सुरुवातीला स्वतः शोध घेतला, पण काही ठावठिकाणा लागला नाही. तिच्या कंपनीतील सहकारी, मित्र-मैत्रिणीकडे चौकशी करूनही प्रियंकाचा काहीही पत्ता लागलेला नाही. प्रियंका अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबात भीती आणि चिंता पसरली आहे. सर्व ठिकाणी तिचा शोध घेतला जात आहे पण अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
advertisement
शेवटी तिच्या मोठ्या बहिणीने तुर्भे पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला असून प्रियंकाच्या शेवटच्या हालचाली, संपर्कातील लोक आणि तिच्या फोन कॉल्सची चौकशी सुरू आहे. तपास सध्या गुप्त ठेवण्यात आला असून कुणालाही माहिती असल्यास लगेच पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. प्रियंका बेपत्ता झाल्याचे प्रकरण तातडीने सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : ऑफिसला गेलेली तरुणी अचानक गायब; प्रियंका प्रधान बेपत्ता प्रकरणाने खळबळ
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement