जय भानुशालीसोबत घटस्फोट, आता सलमान खानच्या जिगरीला डेट करतेय माही विज? कोण आहे नदीम कुरेशी

Last Updated:
Jay Bhanushali-Mahhi Vij: जयशी घटस्फोट घेताच माहीच्या आयुष्यात नदीम कुरेशी नावाच्या एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली असून, चर्चा तर अशी आहे की हे नातं मैत्रीच्या पलीकडचं आहे.
1/9
मुंबई: टीव्ही विश्वातील आर्टिफिशियल वाटणाऱ्या नात्यांच्या गर्दीत जय भानुशाली आणि माही विज यांची जोडी खूप रिअल वाटायची. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. अवघ्या सहा दिवसांपूर्वी या जोडीने आपल्या १५ वर्षांच्या संसाराला पूर्णविराम दिला.

advertisement
2/9
मात्र, या धक्क्यातून चाहते सावरण्याआधीच माही विजच्या एका सोशल मीडिया पोस्टने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. जयशी घटस्फोट घेताच माहीच्या आयुष्यात नदीम कुरेशी नावाच्या एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली असून, चर्चा तर अशी आहे की हे नातं मैत्रीच्या पलीकडचं आहे.

3/9
नदीमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माहीने एक लांबलचक आणि अतिशय हळवी पोस्ट लिहिली. तिने नदीमला तिची शक्ती, तिचं घर आणि तिचं सुकून म्हटलं आहे. माही म्हणते,
नदीमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माहीने एक लांबलचक आणि अतिशय हळवी पोस्ट लिहिली. तिने नदीमला तिची शक्ती, तिचं घर आणि तिचं सुकून म्हटलं आहे. माही म्हणते, "आम्ही कितीही भांडलो, तरी शेवटी आमचं मौन एकमेकांवरच संपतं. आमचे आत्मे अशा रितीने जोडलेले आहेत की ते कोणालाही समजणार नाहीत."
advertisement
4/9
ही पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी तर्क-वितर्क लढवायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, माही आणि जयची मुलगी तारा नदीमला प्रेमाने 'अब्बा' अशी हाक मारते, ज्यामुळे या नात्यातील जवळीक अधिकच स्पष्ट होतेय.

5/9
आता सर्वांना प्रश्न पडलाय की, ज्याच्यासाठी माहीने इतकी मोठी पोस्ट लिहिली, तो नदीम नेमका आहे तरी कोण? तर नदीम कुरेशी हे मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव आहे. पण त्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे तो बॉलिवूडचा सुलतान सलमान खानचा सर्वात जुना आणि जिगरी दोस्त आहे.

6/9
सलमानने २०१८ मध्ये जेव्हा त्याचं 'SK TV' हे व्हेंचर सुरू केलं, तेव्हा नदीम कुरेशीला या प्रोडक्शन हाऊसचा CEO बनवलं होतं. 'द कपिल शर्मा शो' सारख्या सुपरहिट शोच्या निर्मितीमध्ये नदीमचा मोठा वाटा आहे.

7/9
खुद्द सलमान खानने २०२३ मध्ये नदीमला 'माझा भाऊ' म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्याला गंमतीने 'माझा CC-EE-OO-YO' असं म्हटलं होतं.

8/9
जय भानुशालीसोबत घटस्फोट झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात माहीने नदीमबद्दल इतकं उघडपणे व्यक्त होणं अनेकांना बुचकळ्यात टाकणारं आहे.

9/9
नदीम हा माहीच्या कुटुंबाचा जुना मित्र असला, तरी सध्याच्या परिस्थितीत या पोस्टमुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. सलमान खानच्या इतक्या जवळचा असलेला हा माणूस आता माहीच्या आयुष्यातील रिक्त जागा भरून काढणार का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement