Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; जानेवारीच्या मध्यात कोणाला गुडन्यूज?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope Marathi: दिनांक 12 जानेवारीपासून दुसरा आठवडा सुरू होतोय. काही राशींच्या लोकांसाठी नशीब उजळवणारा ठरू शकतो. केवळ आर्थिक लाभच नाही, तर समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याचीही दाट शक्यता आहे. 12 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत ग्रहांची स्थिती अतिशय खास राहणार आहे. धनु, मकर, कुंभ, मीन राशींवरील साप्ताहिक परिणाम जाणून घेऊ.
बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य हे चारही ग्रह मकर राशीत असल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. यासोबतच बुध आणि सूर्य यांच्या युतीमुळे बुधादित्य योग, बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग, मंगळ आणि सूर्य यांच्या युतीमुळे मंगळ आदित्य राजयोग, तसेच शुक्र आणि सूर्य यांच्या युतीमुळे शुक्रादित्य योग निर्माण होत आहे. धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे आठवड्याचे राशीभविष्य पाहूया.
advertisement
धनु राशीचे साप्ताहिक राशिभविष्य - धनु राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला, म्हणजे 12 ते 17 जानेवारीदरम्यान, कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या जास्त जाणवू शकतात. मात्र 17 जानेवारीनंतर धन घर सक्रिय होईल. अडकलेले पैसे, पगार, बोनस किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्येही सुधारणा होईल आणि मन हलके होईल.
advertisement
मकर राशीचे साप्ताहिक राशिभविष्य - मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय सकारात्मक आणि भाग्यशाली ठरणार आहे. शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध यांच्या प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये मोठी प्रगती, आरोग्यात सुधारणा आणि नवीन संधी मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल. एकूणच हा आठवडा मकर राशींसाठी अत्यंत उत्तम आहे.
advertisement
advertisement
मीन साप्ताहिक राशिभविष्य - मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभ आणि प्रतिष्ठा देणारा ठरेल. 12 जानेवारीनंतर धन घर सक्रिय होणार असल्यामुळे आर्थिक लाभ, नवीन संधी आणि समाजात मान-सन्मान मिळू शकतो. नोकरी आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल. शनीची पूजा किंवा दान केल्यास अधिक सकारात्मक परिणाम मिळतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










