वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 'या' 3 राशींच्या लोकांची उडवणार झोप, एक चूकही पडू शकते महागात!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणांना अत्यंत महत्त्वाच्या खगोलीय आणि आध्यात्मिक घटना मानले जाते. 2026 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.
Astrology News : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणांना अत्यंत महत्त्वाच्या खगोलीय आणि आध्यात्मिक घटना मानले जाते. 2026 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. हे ग्रहण फाल्गुन महिन्यातील अमावस्येला असून ते 'कंकणाकृती' स्वरूपाचे असेल. या ग्रहणाच्या काळात सूर्य हा कुंभ राशीत आणि शतभिषा नक्षत्रात विराजमान असेल.
सिंह
मान-सन्मानाची चिंता सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य देव आहे. जेव्हा सूर्याला ग्रहण लागते, तेव्हा सिंह राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासात घट होते. कामाच्या ठिकाणी वादावादी होऊ शकते आणि तुमच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. आरोग्याच्या तक्रारी, विशेषतः डोळ्यांचे विकार उद्भवू शकतात.
वृश्चिक
आर्थिक नुकसान वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण चतुर्थ भावातून काही समस्या घेऊन येऊ शकते. या काळात आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. कोणालाही दिलेले कर्ज परत मिळणे कठीण होईल. घरगुती कलहामुळे मानसिक शांतता भंग पावेल
advertisement
कुंभ
मानसिक तणाव हे सूर्यग्रहण कुंभ राशीतच होत आहे, त्यामुळे याचा सर्वाधिक प्रभाव याच राशीवर पडेल. विनाकारण भीती वाटणे, निर्णय घेताना गोंधळ होणे आणि जोडीदारासोबतचे संबंध बिघडणे असे प्रकार घडू शकतात. आरोग्याची मोठी काळजी घेण्याची गरज आहे.
कोणती 'एक' चूक पडू शकते भारी?
सर्वात मोठी चूक म्हणजे 'घाईघाईत घेतलेला कोणताही मोठा निर्णय'. ग्रहण काळात ग्रहांची ऊर्जा नकारात्मक असते, त्यामुळे या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा नोकरी बदलण्याचा निर्णय घेतल्यास मोठे नुकसान सोसावे लागू शकते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 4:59 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 'या' 3 राशींच्या लोकांची उडवणार झोप, एक चूकही पडू शकते महागात!










