गळ्यात तुळशीची माळ अन् पिताय दारू? पुण्य तर सोडाच, विचारही करू शकत नाही असे सोसावे लागतील हाल
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात तुळशीला 'वैष्णव' आणि 'पवित्र' वनस्पती मानले जाते. वारकरी संप्रदायापासून ते सामान्य भक्तांपर्यंत अनेक जण गळ्यात तुळशीची माळ धारण करतात.
हिंदू धर्मात तुळशीला 'वैष्णव' आणि 'पवित्र' वनस्पती मानले जाते. वारकरी संप्रदायापासून ते सामान्य भक्तांपर्यंत अनेक जण गळ्यात तुळशीची माळ धारण करतात. शास्त्रांनुसार, ही माळ केवळ भक्तीचे प्रतीक नाही, तर ती धारण केल्याने मन शांत राहते आणि सात्त्विकता वाढते. मात्र, तुळशीची माळ गळ्यात घालणे म्हणजे एका जबाबदारीचा स्वीकार करणे होय.
advertisement
सात्त्विक आहार अनिवार्य: तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करणे. तुळस ही अत्यंत शुद्ध मानली जाते, त्यामुळे अपवित्र गोष्टींचे सेवन केल्यास माळेचा अपमान होतो आणि दोषाचा सामना करावा लागतो. अनेकांच्या मते, या काळात कांदा आणि लसूण खाणे देखील टाळावे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जप आणि नामस्मरण: केवळ माळ घालणे पुरेसे नाही; माळ घातलेल्या व्यक्तीने रोज किमान एक माळ जप किंवा भगवंताचे नामस्मरण करणे आवश्यक आहे. यामुळे माळेची शक्ती कायम राहते आणि तुमच्या सभोवती एक संरक्षक कवच निर्माण होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)










