भाजपची अमरावतीत मोठी कारवाई, पक्षातून 15 जणांची हकालपट्टी, ऐन निवडणुकीत खळबळ
- Reported by:SANJAY SHENDE
- Published by:Prachi Amale
Last Updated:
भाजपने नागपूर, मुंबईनंतर आता अमरावतीमध्ये 15 पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
अमरावती : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. प्रचाराला वेग आला आहे. अनेक ठिकाणी युत्या किंवा आघाड्या झाल्या आहेत, त्यामुळे राजकीय समीकरणं बदललेली आहेत. प्रत्येक्ष पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे मात्र या निवडणुकीत अनेक पक्षांना कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने नागपूर, मुंबईनंतर आता अमरावतीमध्ये 15 पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपने हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी महापौर , नगरसेवकांचा आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे . पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणे, पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचाही प्रयत्न केला आणि महायुतीच्या उमेदवारांना सहकार्य न करणे, या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी पक्षाचा आदेश धुडकावून लावत आपली उमेदवारी कायम ठेवली किंवा महायुतीला विरोध सुरू ठेवला, त्यांच्यावर आता ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
अमरावतीत काय कारवाई करण्यात आली?
भाजपने अमरावतीतील भाजप पक्षातील 15 पदाधिकारी आणि सदस्य निलंबन करण्यात आहे. शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यानी ही कार्यवाही करण्यात आली आहे. पक्षशिस्त भंग आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका तसेच अधिकृत उमेदवारांविरोधात उघड बंडखोरीचा आरोप करत ही करावाई करण्यात आली आहेय. पक्ष निर्णयांना विरोध आणि अपप्रचार केल्याचे निदर्शनास पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला. संघटनात्मक शिस्त धोक्यात आल्याचे स्पष्ट सर्वांना प्राथमिक सदस्यत्व व पदांवरून तात्काळ निलंबन करण्यात आले आहे.
advertisement
काय कारवाई करण्यात आली?
पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यामुळे आणि पक्षविरोधी कारवायांमुळे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. शिस्तभंगासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
आतापर्यंत कुठे कुठे कारवाई करण्यात आली?
नागपूर भाजपमधील 32 जण आणि मुंबई भाजपतील 26 पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. नागपूरमधील भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांच्यासह 32 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. भाजपचे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण यांचाही समावेश आहे. नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी नेत्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. मुंबईत पक्षशिस्त मोडणाऱ्या 26 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे,
advertisement
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 5:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपची अमरावतीत मोठी कारवाई, पक्षातून 15 जणांची हकालपट्टी, ऐन निवडणुकीत खळबळ










