भाजपची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 24 तासात 58 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने 24 तासात तब्बल 58 जणांची हकालपट्टी केली आहे.
मुंबई : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. प्रचाराला वेग आला आहे. अनेक ठिकाणी युत्या किंवा आघाड्या झाल्या आहेत, त्यामुळे राजकीय समीकरणं बदललेली आहेत. प्रत्येक्ष पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे मात्र या निवडणुकीत अनेक पक्षांना कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने 24 तासात तब्बल 58 जणांची हकालपट्टी केली आहे. नागपूर भाजपमधील 32 जण आणि मुंबई भाजपतील 26 पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसा, भाजपने हकालपट्टी केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी महापौर , नगरसेवकांचा आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे . पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणे, पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचाही प्रयत्न केला आणि महायुतीच्या उमेदवारांना सहकार्य न करणे, या कारणास्तव ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यांनी पक्षाचा आदेश धुडकावून लावत आपली उमेदवारी कायम ठेवली किंवा महायुतीला विरोध सुरू ठेवला, त्यांच्यावर आता ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
नागपूरमध्ये कोणावर कारवाई झाली?
नागपूरमधील भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांच्यासह 32 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. भाजपचे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण यांचाही समावेश आहे. नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी नेत्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
काय कारवाई करण्यात आली?
पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यामुळे आणि पक्षविरोधी कारवायांमुळे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. शिस्तभंगासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
मुंबईमध्ये कोणावर कारवाई झाली?
मुंबईत पक्षशिस्त मोडणाऱ्या २६ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दिव्या ढोले (प्रभाग ६०, वर्सोवा), नेहाळ अमर शाह (प्रभाग १७७, माटुंगा), जान्हवी राणे (प्रभाग २०५, अभ्युदयनगर), असावरी पाटील (प्रभाग २, बोरिवली - सध्या शिवसेना UBT कडून निवडणूक लढवत आहेत), मोहन आंबेकर (प्रभाग १६६, कुर्ला), धनश्री बगेल (प्रभाग १३१, पंतनगर) , प्रशांत ठाकूर, जयमुर्गन नाडर, दिवेश यादव, विनित सिंग, अयोध्या पाठक, सरबजीत सिंग संधू, सुचित्रा संदीप जाधव, अमित शेलार, राकेश कोहेलो, सुशील सिंग, सुषमा देशमुख, सिद्धेश कोयंडे आदींना देखील पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
advertisement
हे ही वाचा :
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 7:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 24 तासात 58 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी







