दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची खेळी भाजपचा केला गेम, महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा ट्विस्ट
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राज्यात सत्तेत असलेल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मित्रपक्ष भाजपला मोठा झटका दिल्याची चर्चा आहे.
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेतील गेल्या महिनाभरापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. येथील घडामोडींची चर्चा राज्यात नाही तर दिल्लीत देखील झाली.महिन्याभरापासून अंबरनाथचं राजकारण सातत्याने चर्चेत आहे. भाजपने अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापना करण्यासाठी कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेसशी युती केल्याने बालकिल्ल्यात शिंदेंना मोठा धक्का बसला होता. मात्र २४ तासातच शिंदेसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन केला केली आहे. सत्तेत असलेल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मित्रपक्ष भाजपला मोठा झटका दिल्याची चर्चा आहे.
अंबरनाथमध्ये झालेल्या नगपालिका निवडणुकी एकनाथ शिंदेंची सेना, भाजप स्वबळावर लढले. शिंदेसेनेला सर्वाधिक 27, तर भाजपला 14 जागा मिळाल्या. पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारत भाजपनं शिंदेसेनेला धक्का दिला. शिवसेनेला सत्तेपासून दूर राखण्यासाठी भाजपनं हालचाली सुरु केल्या. अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने काँग्रेसचे १० नगरसवेक फोडले आणि त्यांचा भाजप प्रवेश करून घेतला. मात्र काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांसोबत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्नच राहिले. कारण २४ तासात बालेकिल्ल्यात राजकीय समीकरण बदलले असून शिंदेसेनेने अदितदादांच्या चार नगसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे.
advertisement
राष्ट्रवादीच्या कोणत्या नगरसेवकांनी शिंदेसेनेला दिला पाठींबा
अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना आता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. त्याचसोबत एका अपक्षानेही त्यांना पाठिंबा दिला असून एकूण 32 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे. सदाशिव पाटील, मीरा शेलार, सचिन पाटील, सुनिता पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेला पाठींबा दिला आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये महायुतीत असणारे दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे पक्ष एकत्र आले असून भाजपला चेकमेट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात संगली आहे.
advertisement
अंबरनाथ नगरपरिषदेतील पक्षीय बलाबल
- शिवसेना: 27
- शिवसेनेला पाठिंबा देणारा अपक्ष: 1
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): 4
- शिवसेना समर्थक एकूण: 32
- भाजप: 14
- काँग्रेस: 12
रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का
ही घडामोड भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे. त्यांनीच काँग्रेससोबतची आघाडी घडवून आणली होती तसेच नंतर हकालपट्टी केलेल्या काँग्रेस नगरसेवकांचा भाजपमध्ये समावेश करून घेतला होता.या घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्याने नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
advertisement
हे ही वाचा :
view commentsLocation :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 5:38 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची खेळी भाजपचा केला गेम, महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा ट्विस्ट











