माझ्या नातवाचे तिकीट कापले, आजीने थेट भाजप मंत्र्याची अडवली वाट; नाद खुळा व्हिडीओ व्हायरल
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
- Published by:Prachi Amale
Last Updated:
कोल्हापूर येथे भाजपच्या प्रचारासाठी आलेल्या चंद्राकात पाटील यांना एका आजीने विचारलेला थेट प्रश्न सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कोल्हापूर : महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अनेक ठिकाणी, वर्षानुवर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून, अलीकडेच पक्षात दाखल झालेल्या किंवा बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिली जात आहे. यामुळे निष्ठावंतांच्या भावना अनावर झाल्या आहेत. कोल्हापूरात देखील नातवाला तिकिट न मिळाल्याने आजीने थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाब विचारला आहे. कोल्हापूर येथे भाजपच्या प्रचारासाठी आलेल्या चंद्राकात पाटील यांना एका आजीने विचारलेला थेट प्रश्न सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महानगरपालिका निवडणुकंसाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी संबंधित आजीचा नातू इच्छुक होता. स्थानिक पातळीवर त्याने तयारीही केली होती. मात्र उमेदवारांच्या यादीत नाव न आल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अखेर या नाराजीचा उद्रेक थेट मंत्र्यांसमोरच झाला. मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी अचानक एका आजीने त्यांचा रस्ता अडवला. “माझ्या नातवाचं तिकीट का कापलं?” असा थेट सवाल करत आजीने आपली व्यथा मांडली. आजीचा रोखठोक सवाल आणि त्यामागची भावनिक बाजू पाहून उपस्थित कार्यकर्तेही क्षणभर अवाक झाले.
advertisement
आजीचा राग निवळला
या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी संयम दाखवत आजीचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. 'यावेळी जमलं नाही, पण पुढच्या वेळी नक्की बघू', असे आश्वासन देत त्यांनी आजीची समजूत काढली. चंद्रकात पाटील यांच्या आश्वासनानंतर आजीचा राग काहीसा निवळला.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
advertisement
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत अनेकदा उमेदवारीवरून नाराजीचे सूर उमटतात, मात्र थेट आजीने मंत्र्यांना जाब विचारण्याची ही घटना वेगळीच ठरली आहे. कोल्हापुरातील या घटनेमुळे निवडणूक रणधुमाळीत असा हलकाफुलका पण लक्ष वेधणार प्रसंग सर्वांच्या लक्षात राहणारा ठरत आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 3:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माझ्या नातवाचे तिकीट कापले, आजीने थेट भाजप मंत्र्याची अडवली वाट; नाद खुळा व्हिडीओ व्हायरल








