सोलापूर : पदवी पूर्ण झाल्यानंतर बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात भटकत असतात तर काहीजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. पण सोलापूर शहरातील एका होतकरू विद्यार्थ्याने शिक्षणासोबतच एक लहानसा व्यवसाय सुरू केला असून इतर तरुणांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. बीकॉम सेकंड इयरमध्ये शिक्षण घेणाऱ्या चेतन दिंडोरे या 19 वर्षीय तरुणाने एक महिन्यापूर्वी मसाला चिप्स हा व्यवसाय सुरू केला आहे. तर या व्यवसायातून सर्व खर्च वजा करून चेतन महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांची कमाई करत आहे.
Last Updated: Jan 11, 2026, 19:16 IST


