Pune Traffic Changes: पुणेकरांनो, घराबाहेर पडण्याआधी हे वाचाच; आज मुख्य रस्त्यांवर वाहतूक बदल, कोणते मार्ग बंद? पाहा पर्यायी रस्ते
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आज सकाळी सात वाजल्यापासून लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत
पुणे: आज ६ मार्च रोजी तिथीनुसार साजरी होणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पुण्यात विविध ठिकाणी भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती पेठांमधील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी आजच्या प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतुकीत काय बदल झाले आहेत?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजल्यापासून लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, मिरवणूक पुढे सरकल्यानंतर वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत केली जाईल.
पर्यायी मार्ग: छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक जंगली महाराज रस्ता (स. गो. बर्वे चौक), झाशीची राणी चौक, डेक्कन जिमखाना आणि टिळक रस्त्याने वळवण्यात आली आहे.
advertisement
पेठांमधील बदल: कसबा पेठेतील गणेश रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद असून, ती वाहतूक दारुवाला पूल चौकातून वळवण्यात आली आहे. तसेच, नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील वाहतूक अप्पा बळवंत चौक आणि बुधवार चौकाकडे वळवण्यात आली आहे.
लष्कर (कॅम्प) भागातील स्थिती
लष्कर भागातही सायंकाळच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गोळीबार मैदान, व्होल्गा चौक, महावीर चौक आणि बाबाजान चौक परिसरातील वाहतुकीत गरज भासल्यास त्वरित बदल करण्यात येणार आहेत. महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक वाय जंक्शनवरून वळवण्यात येणार आहे.
advertisement
वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी वाहन चालकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, शक्य असल्यास मुख्य भागातील प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 6:45 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic Changes: पुणेकरांनो, घराबाहेर पडण्याआधी हे वाचाच; आज मुख्य रस्त्यांवर वाहतूक बदल, कोणते मार्ग बंद? पाहा पर्यायी रस्ते







