Heart Attackवरील नव्या रिसर्चने सर्वांच्या छातीत आली बारीक कळ, अटॅकच्या आधी शरीर काय लपवतं;लक्षणं नसतील तरी सावध राहा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Heart Attack New Research: हृदयविकार आणि स्ट्रोक अचानक होत नाहीत, तर शरीरात आधीपासून लपलेल्या काही जोखीम घटकांचा त्यामागे मोठा हात असतो, असे नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनातून स्पष्ट झाले आहे. लक्षणं दिसत नसली तरी वेळीच सावध राहणं आणि प्रतिबंधात्मक उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.
हृदयविकार, पक्षाघात (स्ट्रोक) आणि इतर गंभीर हृदयविषयक आजार अचानक होत नाहीत, तर बहुतेक वेळा ते चार ओळखीच्या पण दुर्लक्षित आरोग्यजोखमींचा परिणाम असतात, असे एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या अभ्यासानुसार, हृदयविकाराशी संबंधित तब्बल 99 टक्के गंभीर घटनांचा संबंध उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, जास्त रक्तातील साखर आणि तंबाखू सेवनाशी आहे.
advertisement
Journal of the American College of Cardiology मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, अमेरिका आणि दक्षिण कोरिया येथील 90 लाखांहून अधिक प्रौढ नागरिकांच्या डेटाचे विश्लेषण या अभ्यासात करण्यात आले. 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनाला आतापर्यंतच्या सर्वात व्यापक अभ्यासांपैकी एक मानले जात आहे. संशोधनातून एकच गोष्ट ठळकपणे समोर आली आहे ती म्हणजे, वेळीच प्रतिबंध आणि जीवनशैलीतील बदल केल्यास हृदयविकार मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.
advertisement
विशेष म्हणजे 60 वर्षांखालील महिलांमध्ये ज्या सामान्यतः कमी जोखमीच्या गटात मानल्या जातात त्यांच्यातही 95 टक्क्यांहून अधिक हृदयविकाराच्या घटना या चारपैकी किमान एका जोखमीशी जोडलेल्या आढळल्या.

उच्च रक्तदाब सर्वात मोठा दोषी
advertisement
या चार घटकांपैकी उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) हा सर्वात मोठा कारणीभूत घटक ठरला. हृदयविकार, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअरचा सामना करणाऱ्या 93 टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला.
या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी फाइनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. फिलिप ग्रीनलँड म्हणतात, या संशोधनातून स्पष्टपणे सिद्ध होते की हृदयविकार होण्यापूर्वी जवळजवळ प्रत्येक व्यक्तीमध्ये एक किंवा अधिक टाळता येण्याजोगे जोखीम घटक अस्तित्वात असतात.
advertisement
ते पुढे सांगतात, आता आपले लक्ष अशा घटकांवर नियंत्रण मिळवण्यावर असायला हवे, जे बदलता येऊ शकतात. उपचार कठीण असलेल्या किंवा थेट कारण नसलेल्या गोष्टींच्या मागे लागण्यात अर्थ नाही.
‘जोखीम नसताना हृदयविकार’ या दाव्यांना छेद
या निष्कर्षांमुळे अलीकडे मांडल्या जात असलेल्या जोखीम घटक नसतानाही हृदयविकार वाढत आहेत या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संशोधकांच्या मते, पूर्वीच्या काही अभ्यासांमध्ये लपलेले किंवा सुरुवातीच्या टप्प्यातील जोखीम घटक ओळखले गेले नसावेत, किंवा ते वैद्यकीय मर्यादेपेक्षा कमी असल्याने दुर्लक्षित झाले असावेत.
advertisement
या अभ्यासासोबत प्रसिद्ध झालेल्या संपादकीयात ड्युक विद्यापीठाच्या हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नेहा पगिडिपती यांनीही लवकर प्रतिबंधाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्या म्हणतात, आपण याबाबतीत नक्कीच अधिक चांगले काम करू शकतो आणि करायलाच हवे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 7:20 PM IST
मराठी बातम्या/science/
Heart Attackवरील नव्या रिसर्चने सर्वांच्या छातीत आली बारीक कळ, अटॅकच्या आधी शरीर काय लपवतं;लक्षणं नसतील तरी सावध राहा











