advertisement

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघात प्रकरणात FIR ची मागणी, रोहित पवार ४० मिनिटांपासून पोलीस ठाण्यात, हजारो बारामतीकर एकवटले

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash: दिवंगत अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात एफआयआर दाखल करून तपास करण्याच्या मागणीसाठी हजारो बारामतीकर एकवटले.

दादांच्या अपघात प्रकरणात FIR दाखल करा,  रोहित पवार ४० मिनिटांपासून पोलीस ठाण्यात, हजारो बारामतीकर एकवटले
दादांच्या अपघात प्रकरणात FIR दाखल करा, रोहित पवार ४० मिनिटांपासून पोलीस ठाण्यात, हजारो बारामतीकर एकवटले
बारामती: दिवंगत अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात एफआयआर दाखल करून तपास करण्याच्या मागणीसाठी हजारो बारामतीकर एकवटले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. मागील ३० मिनिटाहून अधिक वेळ त्यांची पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे पोलीस ठाण्याबाहेर बारामतीकरांनीदेखील गर्दी केली आहे.

राजेंद्र पवार आणि रोहित पवारांची आक्रमक भूमिका

अजित पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार, पुतणे युगेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. घोषणांबाजीने परिसर दणाणून गेला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, "बारामती आणि महाराष्ट्रातील जनतेला या प्रकरणाची सत्यता जाणून घ्यायची आहे. माहिती देण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने लोकांच्या मनात शंका बळावत असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
आंदोलनकर्त्यांनी विमान अपघाताच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "ब्लॅक बॉक्स जळाला असल्याचे जे सांगितले जात आहे, ते पूर्णपणे संशयास्पद आहे. आम्हाला हा नियोजित घातपात वाटतोय," असा थेट आरोप समर्थकांनी केला आहे. काही अदृश्य शक्ती पोलीस गुन्हा दाखल करण्यापासून रोखत असल्याचा खळबळजनक दावाही यावेळी कार्यकर्त्यांनी केला. ज्या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला, त्या 'व्हीएसआर' (VSR) कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.अपघाताचा सविस्तर रिपोर्ट सार्वजनिक करावा आणि वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी म्हटले की, अजितदादांच्या अपघात प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात आम्ही सगळे रोहित पवार यांच्या पाठिशी आहोत. डीजीसीएच्या अहवालात विमान कंपनीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, असे असतानाही व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर दाखल झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
बारामती पोलीस ठाण्याबाहेर सध्या तणावपूर्ण शांतता असून, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.प्रशासनाकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघात प्रकरणात FIR ची मागणी, रोहित पवार ४० मिनिटांपासून पोलीस ठाण्यात, हजारो बारामतीकर एकवटले
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement