मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो दरम्यान भोसरीत आग, मोठी खळबळ

Last Updated:

भोसरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोदरम्यान आग लागल्याने मोठी खळबळ उडाली

News18
News18
पुणे : भोसरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोदरम्यान एक खळबळजनक घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भोसरी मतदारसंघात रोड शो सुरू असतानाच दिघी रोडवरील एका इमारतीवर असलेल्या मोबाईल टॉवरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, काही काळासाठी रोड शो आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. रोड शोदरम्यान कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. याच आतषबाजीदरम्यान उडालेल्या ठिणग्यांमुळे किंवा फटाक्यांच्या ठिणगीमुळे इमारतीवरील टॉवरला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर काही काळासाठी रोड शो थांबवण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि आग पूर्णपणे विझवण्यात आल्यानंतर रोड शो पुढे सुरू करण्यात आला. नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.
advertisement
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून नेमकी आग कशामुळे लागली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.  आतषबाजी करताना अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे सार्वजनिक कार्यक्रमांतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो दरम्यान भोसरीत आग, मोठी खळबळ
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement