दरोडेखोरांची दरियादिली, 10 कोटींचा माल घेऊन मुंबईत आले, 11 लाखांच्या समाजकार्यानंतर जाळ्यात अडकले!

Last Updated:
10 कोटी रुपयांचं सोनं लुटून 11 लाख रुपये दान करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या दरोडेखोरांनी सोनं विकणाऱ्यालाही कमिशन दिलं आहे.
1/8
तामिळनाडूमध्ये दरोडा टाकून हे दरोडेखोर मुंबईमध्ये आले, यानंतर त्यांनी मुंबईत 3 किलो सोनं वितळवलं. वितळवलेल्या सोन्यातील अर्धा किलो सोनं त्यांनी मुंबईमधल्या सोनाराला दिलं, तसंच त्याच्याकडून 15 लाख रुपये घेतले.

advertisement
2/8
दरोड्यातून लुटलेलं सोनं आणि 15 लाख रुपये घेऊन हे दरोडेखोर मुंबईमधून निघाले. यानंतर त्यांनी हरियाणा, मोरेना आणि ग्वालियरसह वेगवेगळ्या ठिकाणी गोशाळेला आणि गरिबांना 11 लाख रुपये दान केले.

3/8
या आरोपींना पोलिसांनी बरवानी येथील सेंधवामध्ये अटक केली, त्यांच्याकडून पोलिसांनी 10 कोटी रुपयांचे 9.424 किलो सोनं, 35 हजार रुपयांची रोकड, एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली.

4/8
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं मांगीलाल कनाराम (22) आणि विक्रम रामनिवास जाट (18) असं आहे. या टोळीने 13 सप्टेंबरला तामिळनाडूच्या त्रिचीमध्ये दरोडा टाकला. चेन्नईचा रहिवासी गुणवंत हा महेश आणि ड्रायव्हर प्रदीपसह दिंडीगूलहून चेन्नईला जात होता.

5/8
या टोळीने चेन्नईला जाणाऱ्या या तिघांची कार थांबवली आणि ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी 10 किलो सोने आणि 3 लाखांची रोख रक्कम चोरली.

6/8
पोलिसांनी घटनेच्या दोन दिवसानंतर पाच आरोपींना अटक केली, पण दोन आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी तब्बल 7 राज्यांमध्ये फरार झालेल्या या दोघांचा शोध घेतला, अखेर त्यांना अटक करण्यात यश आलं.

7/8
आरोपींकडून पोलिसांनी 2 किलो 412 ग्रॅमची 11 सोन्याची बिस्कीटे, 3 किलो 482 ग्रॅमच्या 176 सोन्याच्या बांगड्या, 646 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, 853 ग्रॅमचा सोन्याचा हार, 781 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, सोन्याचा हार आणि दागिने (एकूण वजन 1 किलो 258 ग्रॅम) एवढा ऐवज जप्त केला. जप्त केलेल्या सोन्याचं एकूण वजन 9 किलो 432 ग्रॅम आहे.

8/8
याशिवाय पोलिसांनी आरोपींकडून 3,55,500 रुपयांची रोकड, भरलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे, 20 हजार रुपयांचा मोबाईल फोनही जप्त केला आहे.

एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement