Solpaur News: 20 वर्षांपासून न थकता सेवा, दुकानाच्या नफ्यातून दत्तूभाऊ भाविकांचं भरता पोट!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक जिल्ह्यातून तुळजापुरला तुळजाभवानी मातेचा दर्शन घेण्यासाठी पायी चालत जात असतात. सोलापूर तुळजापूर महामार्गावरून पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी गेल्या 20 वर्षापासून अमरनाथ दत्तराव कटारे हे नाष्ट्याची भाविकांसाठी नाष्ट्याची सोय करत आहे.
सोलापूर: आई राजा उदे उदे....सदानंदीचा उदो उदो चा गजर करीत लाखो भाविक सोलापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक जिल्ह्यातून तुळजापुरला तुळजाभवानी मातेचा दर्शन घेण्यासाठी पायी चालत जात असतात. सोलापूर तुळजापूर महामार्गावरून पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी गेल्या 20 वर्षापासून अमरनाथ दत्तराव कटारे हे नाष्ट्याची भाविकांसाठी नाष्ट्याची सोय करत आहे. या संदर्भात अधिक माहिती अमरनाथ कटारे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
अमरनाथ दत्तराव कटारे हे मूळचे विजयपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. अमरनाथ यांचं विजयपूर मध्ये लहानसा रेडिमेड दुकान आहे. दररोज व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून 500 रुपये काढून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी नाष्ट्याची सोय करतात. सोलापूर- तुळजापूर महामार्गावर गेल्या 20 वर्षापासून भक्तांसाठी मोफत नाष्ट्याची सोय करत आहे. पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी वडा, जिलेबी तसेच पिण्याच्या पाण्याची सोय अमरनाथ करत आहे.
advertisement
विजयपूर राज्यातून येऊन सोलापुरातील जुना तुळजापूर नाका येथे रस्त्यावरच पत्राचा लहानसा शेड मारून तेथेच राहतात व भाविकांसाठी गरमागरम नाष्ट्याची सोय करतात. दोन ते तीन दिवस जवळपास 300 किलो बटाटा वडे आणि जिलेबी बनवतात.जवळपास 20 सेवेकरी पायी चालत जाणाऱ्या भाविकांची सेवा करतात. साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ म्हणून तुळजाभवानी मंदिराची ओळख आहे दसरा उत्सव संपल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला मोठ्या उत्साहाने भाविक महाराष्ट्रसह, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातून तुळजापूरला पायी चालत जातात. लाखो भाविकांच्या गर्दीने सोलापूर व तुळजापूर हा महामार्ग भक्तीने फुलून गेले आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 06, 2025 9:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solpaur News: 20 वर्षांपासून न थकता सेवा, दुकानाच्या नफ्यातून दत्तूभाऊ भाविकांचं भरता पोट!