BB19 च्या घरात अमाल मलिकचं किळसवाणं कृत्य! रात्रीच्या अंधारात केलं घाणेरडं काम, नेटकऱ्यांनी पकडलं; VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amaal Malik in Bigg Boss : 'बिग बॉस १९' मध्ये गायक अमाल मलिक सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता अमालची आणखी एक किळसवाणी कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मुंबई : 'बिग बॉस १९' मध्ये गायक अमाल मलिक सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अशनूर कौरबद्दल त्याने वापरलेल्या वादग्रस्त शब्दांमुळे मोठा गदारोळ झाला होता. याच मुद्द्यावरून 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानने त्याला खडसावले नाही, म्हणून चाहते आधीच संतापले होते. पण आता अमालची आणखी एक लाजीरवाणी आणि किळसवाणी कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, जी पाहून प्रेक्षक खूप भडकले आहेत.
'बिग बॉस १९' च्या घरातून अमाल मलिकचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शोच्या एपिसोडमधून वगळण्यात आला होता, पण आता तो बाहेर आला आहे. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी अमाल मलिक थेट किचनमध्ये जातो आणि तिथे असलेल्या वॉटर प्युरिफायर मशीनच्या पाईपला तोंड लावून पाणी पितो. इतकेच नाही, तर तो ते पाणी तोंडात धरून थेट भांड्यांनी भरलेल्या सिंकमध्ये चूळ भरतो! ही किळसवाणी कृती कॅमेरात स्पष्टपणे कैद झाली आहे.
advertisement
अमाल मलिकची ही कृती पाहून प्रेक्षकांना प्रचंड राग आला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे. एका युजरने संतापून लिहिले, "आपल्या घरीही असाच वागतो का हा माणूस?" तर दुसऱ्याने, "घाणेरडी कृती आणि घाणेरडी भाषा असलेला माणूस," अशी टीका केली. सिंकमध्ये भांडी असताना चूळ भरणे लोकांना अजिबात रुचलेले नाही. एका प्रेक्षकाने लिहिले, "किळस वाटत आहे हे बघून, तिथे भांडी पण ठेवलेली आहेत."
advertisement
advertisement
यापूर्वी एका स्पर्धकाला त्याने बेडवर खाण्यावरून टोमणा मारला होता, तेव्हा आता त्याची ही 'किळस' दाखवणारी कृती पाहून लोक त्यालाच प्रश्न विचारत आहेत. एकूणच, अमाल मलिकची ही रात्रीची गोष्ट त्याला आता चांगलीच महागात पडणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 9:17 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
BB19 च्या घरात अमाल मलिकचं किळसवाणं कृत्य! रात्रीच्या अंधारात केलं घाणेरडं काम, नेटकऱ्यांनी पकडलं; VIDEO