Gold मार्केटमध्ये महाभूकंप, सोने-चांदीच्या दरावर विनाशकारी भविष्यवाणी; तज्ज्ञांचा अंदाज ऐकून बाजार हादरला

Last Updated:

Gold Price Crash Soon: सोनं आणि चांदीच्या भावात आकाशाला भिडलेली तेजी आता धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. तज्ज्ञ अमित गोयल यांनी इशारा दिला आहे की- पुढील काही महिन्यांत या धातूंमध्ये 30 ते 50 टक्क्यांची प्रचंड घसरण होऊ शकते.

News18
News18
मुंबई: सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड तेजी दिसून येत असली तरी आता या तेजीचा शेवट जवळ आला असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. PACE 360 चे सहसंस्थापक आणि चीफ ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट अमित गोयल यांनी सांगितले आहे की- सध्याची तेजी “मोठ्या रिफ्लेशनरी बबल”सारखी आहे आणि पुढील काही महिन्यांत सोने-चांदीच्या भावात 30 ते 50 टक्क्यांपर्यंतची घसरण होऊ शकते. त्यांच्या मते आता गुंतवणूकदारांनी सावध राहण्याची गरज आहे कारण ही रॅली आपल्या अंतिम टप्प्यात आहे.
advertisement
गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदी दोन्हीही विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सध्या सोने सुमारे $4,000 प्रति औंस आणि चांदी $50 च्या आसपास व्यवहार करत आहे. मात्र अमित गोयल यांच्या मते ही तेजी जास्त दिवस टिकणार नाही.
advertisement
त्यांच्या म्हणण्यानुसार सध्याची सोने-चांदीतील वाढ “रिफ्लेशनरी बबल”प्रमाणे आहे जी लवकरच फुटू शकते. ते म्हणाले, गेल्या 40 वर्षांत फक्त दोनदा असं झालं की सोने-चांदीने इतकं चांगलं प्रदर्शन केलं आणि डॉलर इंडेक्स कमकुवत राहिला. त्या दोन्ही वेळा नंतर या धातूंमध्ये प्रचंड करेक्शन (गिरावट) आली होती.
advertisement
गोयल यांच्या मते, यावेळीही असंच काहीसं होण्याची शक्यता आहे. आधी सोने आणि चांदी त्यांच्या मनोवैज्ञानिक स्तरांपर्यंत गोल्ड $4,000 आणि सिल्वर $50 पोहोचतील आणि तिथूनच जोरदार विक्री सुरू होईल.
किती पडू शकते किंमत?
गोयल यांचा अंदाज आहे की पुढील एक वर्षात सोन्यात 3035% पर्यंत घसरण होऊ शकते, तर चांदीत 50% पर्यंत करेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यांनी 200708 आणि 2011 मधील उदाहरण दिलं, जेव्हा मोठ्या तेजीच्या काळानंतर सोने-चांदीच्या भावात प्रचंड घसरण झाली होती.
advertisement
त्यांच्या मते सोने $2,600–$2,700 प्रति औंस पर्यंत घसरू शकते. ते म्हणाले, त्या स्तरावर पोहोचल्यावरच सोने पुन्हा एकदा उत्तम गुंतवणूक ठरू शकते, पण सध्या त्यात मोठा धोका आहे.
गोयल यांनी पुढे सांगितले की, पुढील 2-3 वर्षांत अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जागतिक मंदी येऊ शकते. ज्याचा थेट परिणाम चांदीच्या औद्योगिक मागणीवर (फोटोव्होल्टिक, सेमीकंडक्टर, ईव्ही सेक्टर) होऊ शकतो. म्हणजेच दशकभरानंतर पहिल्यांदाच चांदीची खप कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
पार्टी संपली आहे
अमित गोयल यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की- सध्या तरी पार्टी संपणार आहे” त्यांच्या म्हणण्यानुसार थोड्या काळासाठी बाजारात आणखी थोडी रॅली दिसू शकते, पण ती टिकाऊ नसेल. खरा संधीचा काळ तेव्हाच येईल जेव्हा किंमती घसरणीनंतर स्थिर होतील. त्या वेळी सोने पुन्हा एकदा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
advertisement
मराठी बातम्या/मनी/
Gold मार्केटमध्ये महाभूकंप, सोने-चांदीच्या दरावर विनाशकारी भविष्यवाणी; तज्ज्ञांचा अंदाज ऐकून बाजार हादरला
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement