Aapli St App: आता रेल्वेप्रमाणे ST सुद्धा ट्रॅक करता येणार, प्रवास होणार आणखी सोयीस्कर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Aapli St App: जिल्हा स्तरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेप्रमाणेच आता एसटीची सुद्धा ट्रॅकिंग होणार आहे. अमुक तमूक ठिकाणी जाणारी बस केव्हापर्यंत असा प्रश्न पडलेल्या प्रवाशांना सारखा सारखा प्रश्न विचारायला लागणार नाही.
महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आजही एसटी बसचा वापर केला जातो. जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणावर एसटी सेवेचा प्रवासी लाभ घेतात. जिल्हा स्तरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेप्रमाणेच आता एसटीची सुद्धा ट्रॅकिंग होणार आहे. अमुक तमूक ठिकाणी जाणारी बस केव्हापर्यंत असा प्रश्न पडलेल्या प्रवाशांना सारखा सारखा प्रश्न विचारायला लागणार नाही. कारण आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ‘आपली एसटी’ या नवीन ॲपद्वारे प्रत्येक थांब्यावर बसचे अचूक ठिकाण आणि आगमन वेळ कळणार आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ‘आपली एसटी’ ॲपचे उद्घाटन करण्यात आले आहे. ‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ कंपनीच्या सहकार्याने विकसित झालेल्या या ॲपमुळे प्रवास अधिक सुगम, सुरक्षित आणि विश्वासार्ह्य होईल, असा दावा एसटी महामंडळाकडून करण्यात आला आहे. एसटी बस डेपोमध्ये किंवा थांब्यावर वेळेवर न पोहोचल्याने प्रवाशांना तासंतास थांब्यावर वाट पाहावी लागते. पण आता जास्त थांबावं लागणार नाही, कारण जर तुमच्याकडे ‘आपली एसटी’ॲप असेल तर त्या अॅपच्या माध्यमातून बसची वेळ समजेल.
advertisement
‘आपली एसटी’ॲपच्या माध्यमातून आपल्या जवळील बसस्थानकांची माहिती, बस सुटण्याची वेळ आणि थांब्यावर पोहोचण्याचा अंदाज कळेल. त्यामुळे प्रवासी वेळेची बचत करून थेट बस उपलब्ध असतानाच थांब्यावर हजर होऊ शकतील. राज्यभरातले १ लाखापेक्षा अधिक मार्ग आणि १२ हजार बसची माहिती अॅपमध्ये समाविष्ट केली असून ती माहिती युजर्सला तात्काळ उपलब्ध होईल. एसटी बस ट्रॅकिंगचा ॲप नवीन असल्यामुळे सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. याबाबत मंत्री सरनाईक यांनी प्रवाशांना सूचना देण्याचे आवाहन केले असून, एसटी महामंडळ त्या त्वरित दूर करेल. ॲप अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, सध्या ‘एमएसआरटीसी कम्यूटर’ नावाने प्ले स्टोअरवर डाउनलोड करता येईल. लवकरच अधिकृत नाव ‘आपली एसटी’ असं करण्यात येणार आहे.
advertisement
वेळेची बचत, सुरक्षितता आणि सोयीस्कर सेवांमुळे एसटी बसची वाहतूक अधिक आकर्षक होईल. एसटी महामंडळाने या ॲपद्वारे प्रवासाला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला असून, प्रवाशांच्या अभिप्रायावरून त्यात आणखी सुधारणा केल्या जाणार आहेत.
Location :
Maharashtra
First Published :
October 06, 2025 8:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Aapli St App: आता रेल्वेप्रमाणे ST सुद्धा ट्रॅक करता येणार, प्रवास होणार आणखी सोयीस्कर