Railway Timetable : 'वेटिंग लिस्ट'ची चिंता सोडा! पनवेल-चिपळूण दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू; पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे

Last Updated:

Diwali Special Trains Between Panvel And Chiplun : मध्य रेल्वेने पनवेल आणि चिपळूण दरम्यान विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

News18
News18
मुंबई : दिवाळीच्या काळात वाढणाऱ्या प्रवासी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून एकूण 30 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये पनवेल-चिपळूणदरम्यान 24 विशेष गाड्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान 6 गाड्या धावणार आहेत.
पनवेल-चिपळूण स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक
गाडी क्रमांक 01159 अनारक्षित पनवेल-चिपळूण विशेष रेल्वेगाडी 3 ऑक्टोबरपासून 26 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावणार आहे. ही गाडी पनवेलहून दुपारी 4.40 वाजता सुटेल आणि चिपळूण येथे रात्री 9.55 वाजता पोहोचेल.
परतीची गाडी क्रमांक 01160 अनारक्षित चिपळूण-पनवेल विशेष रेल्वेगाडी त्याच तारखांना म्हणजे 3 ते 26 ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवार धावणार आहे. ही गाडी चिपळूणहून सकाळी 11.05 वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुपारी 4.10 वाजता पोहोचेल.
advertisement
जाणून घ्या गाडीचे थांबे 
पनवेल ते चिपळूणदरम्यान या विशेष रेल्वेगाडीला सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी या स्थानकांवर थांबा असेल.
गाडीमध्ये एकूण किती डबे?
या विशेष गाडीत एकूण 8 मेमू डबे असतील. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मते या अतिरिक्त गाड्यांमुळे कोकणमार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे या अतिरिक्त गाड्यांमुळे गर्दीचे नियोजन सुलभ होईल आणि प्रवाशांना वेळेवर प्रवास करता येईल.
advertisement
रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की या विशेष गाड्यांची माहिती आणि वेळापत्रक IRCTC च्या वेबसाईटवर तपासावे. प्रवास करताना नियम पाळावे आणि शक्य असल्यास आधीच तिकीट बुक करावे असे सांगितले आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी अधिक सुविधा आणि सोय उपलब्ध होणार आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Railway Timetable : 'वेटिंग लिस्ट'ची चिंता सोडा! पनवेल-चिपळूण दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू; पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement