Mumbai: अंधेरीत हायप्रोफाईल देहविक्री रॅकेट; ऑनलाईन बूक व्हायच्या तरुणी, हॉटेलवर येताच...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Mumbai: मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट १० च्या अधिकाऱ्यांनी अंधेरी परिसरात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
मुंबई: मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट १० च्या अधिकाऱ्यांनी अंधेरी परिसरात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुलोचना नावाच्या मुख्य दलाल महिलेला अटक केली असून, तिच्या तावडीतून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवा येथे राहणारी सुलोचना ही एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे हे सेक्स रॅकेट चालवत होती. गुन्हे शाखेच्या युनिट १० च्या अधिकाऱ्यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक सापळा रचला.
बोगस ग्राहक आणि यशस्वी छापा
पोलिसांनी एका बोगस ग्राहकाची मदत घेऊन सुलोचनाशी संपर्क साधला. या बनावट ग्राहकाने सुलोचनाकडे काही तरुणींची मागणी केली. त्यानंतर, त्यांच्यात फोनवरच सर्व आर्थिक व्यवहार निश्चित करण्यात आले. ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने सुलोचनाला या तरुणींना अंधेरीच्या मरोळ परिसरातील एका हॉटेलमध्ये आणण्यास सांगितले.
advertisement
दोन दिवसांपूर्वी सुलोचना या तीन तरुणींसह मरोळ येथील हॉटेलमध्ये आली. ती बोगस ग्राहकाशी पैशांची देवाणघेवाण करत असतानाच, दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलमध्ये तत्काळ छापा टाकला.
आरोपी महिला अटकेत, तरुणींची सुधारगृहात रवानगी
या छाप्यात पोलिसांनी सुलोचनाला जागीच ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या तिन्ही तरुणींची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, या तरुणींनी सांगितले की, त्या सुलोचनाच्या सांगण्यावरून विविध ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जात होत्या. पोलिसांनी तिन्ही पीडित तरुणींची सुटका करून त्यांना अंधेरीतील महिला सुधारगृहात पाठवले आहे. गुन्हे शाखेने ऑनलाइन चालणाऱ्या या सेक्स रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणि यातील इतर सहभागींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. दिवा येथील रहिवासी असलेल्या सुलोचनाच्या अटकेमुळे या रॅकेटचे आणखी धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 06, 2025 8:00 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: अंधेरीत हायप्रोफाईल देहविक्री रॅकेट; ऑनलाईन बूक व्हायच्या तरुणी, हॉटेलवर येताच...