Women Health : पुरुषांपेक्षा महिला कर्मचारी करतात जास्त धूम्रपान! कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Last Updated:

Increasing Women Smoking Rate : कामातून थोडीशी सुटका मिळवण्यासाठी अनेक तरुणी आणि मुलींच धूम्रपान करण्याकडे काळ वाढतो आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिला विशेषतः धूम्रपान करण्यास प्रवृत्त असल्याचे तुम्ही पाहिले असेल.

आयटी क्षेत्रात महिला करतात सर्वाधिक धूम्रपान..
आयटी क्षेत्रात महिला करतात सर्वाधिक धूम्रपान..
मुंबई : तुम्ही पाहिले असेल की, अनेक महिला आता घर आणि ऑफिस या दोन कामांमध्ये आराम न करताच काम करत आहेत. त्यामुळे मानसिक ताण वाढतो. यातून थोडीशी सुटका मिळवण्यासाठी अनेक तरुणी आणि मुलींच धूम्रपान करण्याकडे काळ वाढतो आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिला विशेषतः धूम्रपान करण्यास प्रवृत्त असल्याचे तुम्ही पाहिले असेल. सध्याच्या माहितीनुसार, पुण्यातील 20 टक्के महिला धूम्रपान करतात असे समोर आले आहे. परंतु यामुळे भविष्यात महिलांना अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता आहे, असे डॉ. रवी पवार यांनी लोकल18 ला सांगितले.
कामाच्या ताणातून थोडीशी सुटका मिळवण्यासाठी तरुणी आणि मुलींना धूम्रपान करण्याची सवय लागतात. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिला खूप धूम्रपान करतात हे तुम्ही पाहिले असेल. सध्याच्या माहितीनुसार, पुण्यातील 20 टक्के महिला धूम्रपान करतात हे उघड झाले आहे. परंतु यामुळे भविष्यात महिलांना अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता आहे, असे डॉ. रवी पवार यांनी लोकल18 ला सांगितले.
advertisement
महिलांमध्ये मानसिक ताणाचे प्रमाण जास्त असते.
कामावर जाणाऱ्या अनेक महिला त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे जास्त वेळा धूम्रपान करतात. 'आयटी हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अनेक तरुणी आणि महिला काम करतात. मात्र कामाचा ताण, जास्त कामाचे तास, घरगुती जबाबदाऱ्या आणि पुरेशी झोप न मिळणे अशा अनेक कारणांमुळे महिलांचा मानसिक ताण वाढत आहे. यामुळे महिलांना नैराश्य, डोकेदुखी आणि थकवा यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या ताणापासून मुक्तता मिळवण्यासाठी महिला धूम्रपानाला बळी पडत आहेत. परंतु धूम्रपानाचा महिलांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतो.
advertisement
'धूम्रपान करणाऱ्या महिलांना फुफ्फुसांचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. जास्त धूम्रपान केल्याने महिलांच्या श्वसनसंस्थेवर आणि हृदयसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे कालांतराने कर्करोगाचा धोकाही वाढतो. फुफ्फुस आणि हृदयाच्या आरोग्यासाठी धूम्रपान पूर्णपणे थांबवणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. याशिवाय दिवसभर दबावाखाली काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांना मानसिक आधार देण्याची गरज आहे,' असे डॉ. रवी पवार म्हणतात.
advertisement
आयटी क्षेत्रात महिला करतात सर्वाधिक धूम्रपान..
आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि तरुणींमध्ये धूम्रपान करण्याची शक्यता जास्त असल्याचे आढळून आले आहे. मानसिक ताण, कामाचे जास्त तास, रात्रीच्या शिफ्ट आणि लॅपटॉप आणि मोबाईल फोनवर नेहमी ऑनलाइन राहण्याची गरज यामुळे आयटी क्षेत्रातील तरुणींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे.
आरोग्यास होणारी हानी..
सिगारेट ओढल्याने महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. शिवाय त्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते. धूम्रपानामुळे इस्ट्रोजेनची पातळी कमी होते आणि अंडाशयांचे नुकसान होते. जास्त मद्यपान केल्यानेदेखील मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि गर्भवती राहण्याची शक्यता कमी होते.
advertisement
'धूम्रपान निषिद्ध' क्षेत्र गरजेचे..
आयटी कंपन्यांनी ऑफिसच्या परिसरात 'नो स्मोकिंग झोन' म्हणजेच धूम्रपानमुक्त धोरण लागू करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा वेळेचे आयोजन केल्याने त्यांना ड्रग्ज व्यसनी होण्यापासून रोखता येते. याशिवाय ऑफिसमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Women Health : पुरुषांपेक्षा महिला कर्मचारी करतात जास्त धूम्रपान! कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का..
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement