प्रत्येक भारतीय संतापलाय... PM मोदी यांचा सरन्यायाधीश भूषण गवई यांन फोन, हल्ल्याच्या घटनेचा निषेध

Last Updated:

CJI Bhushan Gavai Shoe Attack: सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला.

नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश गवई
नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश गवई
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने भरगच्च न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त होत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश गवई यांना फोन करून त्यांची विचारपूस केली तसेच घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर एका ज्येष्ठ वकिलाने पायातील बूट काढून सरन्यायाधीश गवई यांच्या दिशेने भिरकाविण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयात उपस्थित सुरक्षारक्षकांनी तसेच पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयाच्या बाहेर नेत असताना सनातनचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत त्याने सरन्यायाधीश गवई यांचा निषेध केल्याचे उपस्थितीतांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांचा सरन्यायाधीश गवई यांना फोन

advertisement
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने प्रत्येक भारतीय संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. ते पूर्णपणे निषेधार्ह आहे. अशा परिस्थितीला तोंड देताना न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या शांततेचे मी कौतुक करतो, असे नरेंद्र मोदी एक्स पोस्टवर म्हणाले. तसेच गवई यांची न्यायमूर्तींच्या मूल्यांप्रती आणि आपल्या संविधानाच्या आत्म्याला बळकटी देण्याप्रती त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते, असे कौतुकही त्यांनी केले.
advertisement
advertisement

घटनेनंतर सरन्यायाधीश गवई काय म्हणाले?

आरोपीला न्यायालयातून बाहेर नेल्यानंतरही या घटनेची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र सरन्यायाधीश गवई यांनी आपण अशा घटनांनी विचलित होत नाही किंबहुना प्रभावितही होत नाही. कामकाज सुरू करू, असे म्हणून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. या संपूर्ण घटनेनंतर सरन्यायाधीश गवई अतिशय शांत होते. त्यांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळली.
advertisement

आरोपी वकील नेमका कोण?

सरन्यायाधीश गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा आरोपी वकिलाचे नाव राकेश किशोर असे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. राकेश किशोर हा सर्वोच्च न्यायालयातील बारचा २०११ पासून सदस्य आहे.
मराठी बातम्या/देश/
प्रत्येक भारतीय संतापलाय... PM मोदी यांचा सरन्यायाधीश भूषण गवई यांन फोन, हल्ल्याच्या घटनेचा निषेध
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement