advertisement

Soybean Rates Today: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सुधारणा, आजचा दर किती ?

Last Updated:

Maharashtra Soybean Rates Today: सोमवार , दिनांक 6 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांचे कृषी मार्केट जाणून घेऊ. यामध्ये सोयाबीन, आले व डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.

+
सोयाबीन 

सोयाबीन 

मुंबई: सोमवार , दिनांक 6 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांचे कृषी मार्केट जाणून घेऊ. यामध्ये सोयाबीन, आले व डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
आले- राज्यातील बाजारात आज आले दर दबावात राहिले. आज राज्याच्या बाजारात एकूण 2735 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 1 हजार 335 क्विंटल आल्याची आवक होऊन त्यास 4500 प्रतिक्विंटल इतका सर्वसाधारण भाव मिळाला. रत्नागिरी मार्केटमध्ये आवक झालेल्या 38 क्विंटल आल्यास सर्वाधिक 5 हजार 500 ते 6 हजार रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये 20 क्विंटल आल्याची आवक होऊन त्यास 1550 रुपये भाव मिळाला.
advertisement
डाळिंब- छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये 29 क्विंटल डाळिंबाची सर्वाधिक आवक झाली. त्यास 3 हजार 250 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये सर्वात कमी आठ क्विंटल डाळिंबाचे आवक होऊन त्यास 12 हजार रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक भाव मिळाला. अतिवृष्टीने डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात.
सोयाबीन- राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 53 हजार 318 क्विंटल सोयाबीनची आवक राहिली. आज जालना मार्केटमध्ये 24 हजार 414क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. त्यास सोयाबीनच्या प्रतीनुसार कमीत कमी 3 हजार 400 ते जास्तीत जास्त 4 हजार 181 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच परभणी मार्केटमध्ये 78 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास प्रतीनुसार 4 हजार 317 ते 4 हजार 697 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक भाव मिळाला.
advertisement
भिजलेल्या सोयाबीनला जास्त दर नाही. भिजलेल्या सोयाबीनला हमीभावाप्रमाणे दर मिळणे शक्य नाही. बाजारात सध्या उपलब्ध सोयाबीन ओलसर असल्याने सोयाबीनचे दर दबावात राहिल्याचे व्यापारी सांगतात. शेतकऱ्यांची अडचण भावात तोटा असून केंद्र सरकारने सोयाबीनसाठी 5 हजार 338 रुपयांचा हमीभाव घोषित केला असला तरी बाजारात भाव सातत्याने दबावात आहेत. यामुळे प्रतिक्विंटल 1000 ते 1500 रुपये तोटा होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Soybean Rates Today: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सुधारणा, आजचा दर किती ?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement