advertisement

दोन वार अन् खेळ खल्लास, मुंबईत तरुणाची भररस्त्यात हत्या, थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Last Updated:

मुंबईतील मानखुर्द परिसरात भरदिवसा एका २८ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

News18
News18
Mumbai News: मुंबईतील मानखुर्द परिसरातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इथं भरदिवसा एका २८ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, हत्येचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

नेमकी घटना काय?

मानखुर्द येथील मंडाला परिसरातील ३० फूट रोडवर अल मदिना हॉटेलजवळ ही घटना काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. वाहिद मसीबुल्ला शेख (वय २८) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो फालुदा विक्रेता होता. घटनेच्या वेळी वाहिद आपला फालुदाचा गाडा घेऊन जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या एका तरुणाने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपीनं पाठीमागून मानेवर दोन वार केले. यात वाहिद जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला.
advertisement

हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आरोपी पाठीमागून गुपचूप येतो आणि वाहिदवर चाकूने हल्ला करतो. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वाहिदला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

उपचारादरम्यान मृत्यू

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वाहिदला स्थानिक नागरिकांनी तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, जखमा खोल असल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
advertisement
[video width="480" height="352" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/Mumbai-shivajinagar-mankhurd-murder-case-2026-03-cc28830030807563c5a50e14ad8d8667.mp4"][/video]
प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या जुन्या वादातून ओळखीच्याच व्यक्तीकडून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मानखुर्द पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
दोन वार अन् खेळ खल्लास, मुंबईत तरुणाची भररस्त्यात हत्या, थरार CCTV कॅमेऱ्यात कैद
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement