नवीन सोयाबीनची आवक वाढली! दर ५,००० रु पार जाणार? मार्केटमधून नवीन अपडेट आली समोर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : गेल्या दोन महिन्यांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसला आहे.
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांच्या शेंगा काळ्या पडल्या, दाण्यांचा आकार लहान राहिला, आणि काही ठिकाणी अंकुर फुटल्याने मालाचा दर्जा खालावला आहे. परिणामी, या हंगामात सोयाबीनचे एकरी उत्पादन घटले असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मात्र, दर्जेदार मालाला अधिक दर मिळण्याची शक्यता असल्याने बाजारपेठेत आशेची किरणे दिसत आहेत.
सततच्या पावसाचा फटका, उत्पादनात घट
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत, तर काही ठिकाणी शेंगा सडल्या किंवा अंकुर फुटले. कृषितज्ज्ञांच्या मते, या नैसर्गिक संकटामुळे यंदा सोयाबीनचे एकरी ‘अॅव्हरेज’ उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. “शेतात पाणी साचल्याने शेंगा काळ्या पडल्या आणि दाणे पूर्ण वाढू शकले नाहीत. त्यामुळे दर्जा खालावला आणि दरात घसरण झाली,” असे कारंजा परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.
advertisement
सोयाबीनची आवक वाढली, पण दर स्थिर नाहीत
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या नव्या हंगामाची आवक सुरू झाली आहे. रोजंदारी वाढत असली तरी दर अपेक्षेइतके आकर्षक नाहीत.
४ ऑक्टोबर रोजी बाजारात सुमारे २०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली, आणि त्या दिवसाचा सरासरी दर ३,६०० रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला. व्यापाऱ्यांच्या मते, “दर सध्या स्थिर असले तरी मालाचा दर्जा चांगला असेल तर अधिक दर मिळू शकतात.” यामुळे सध्या बाजारात दर्जेदार मालासाठी स्पर्धा वाढली आहे, तर सामान्य दर्जाच्या सोयाबीनला मर्यादित मागणी मिळत आहे.
advertisement
दर्जेदार सोयाबीनला उच्च दराची शक्यता
कारंजा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या वाणाची लागवड केली होती, आणि त्यांची काढणी सुरू झाली आहे. सध्या बाजारात अशा दर्जेदार सोयाबीनचा पुरवठा कमी असल्याने, व्यापाऱ्यांकडून उच्च दर्जाच्या मालाला अधिक दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषितज्ज्ञांचे मत आहे की, जर हवामान ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत स्थिर राहिले, तर बाजारातील दर स्थिरावतील आणि उत्पादनात थोडी सुधारणा दिसून येईल.
advertisement
दर वाढले नाहीत तर संकट
शेतकरी मात्र सध्याच्या दरांबाबत नाराज आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, “सोयाबीनचा दर ३,६०० रुपये प्रतिक्विंटल हा खर्च भागवण्यासाठी अपुरा आहे. शेतीवरील खत, बियाणे आणि मजुरीचा खर्च प्रचंड वाढला आहे. जर हवामान सुधारले आणि बाजार स्थिर राहिला, तरच काहीसा दिलासा मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 12:04 PM IST