नाशकात भल्या पहाटे रक्तरंजित थरार, देवदर्शनासाठी जाणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार, जागीच मृत्यू
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मंगळवारी पहाटेच्या सुमारास नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने हत्येच्या घटना घडत आहे. हे शहर गुन्हेगारीचं हॉटस्पॉट बनत आहे. मागील नऊ महिन्यात नाशिकमध्ये तब्बल ४४ खूनाच्या घटना घडल्या आहेत. आता यात आणखी एक भर पडली आहे. आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
अमोल मेश्राम असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आज पहाटेच्या वेळी ते मंदिरात दर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांच्यावर अचानक अज्ञाताने कोयत्याने वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, या हल्ल्यात अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. भल्या सकाळी अशाप्रकारे हत्येची घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून, हत्येमागील कारण आणि आरोपींचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात खून, हाणामाऱ्या आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिककरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
advertisement
नऊ महिन्यात ४४ हत्या
विशेष म्हणजे, गेल्या नऊ महिन्यांत नाशिक शहरात तब्बल ४४ खून झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या गंभीर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी नाशिककर करत आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 07, 2025 12:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशकात भल्या पहाटे रक्तरंजित थरार, देवदर्शनासाठी जाणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार, जागीच मृत्यू