Smriti Mandhana : स्मृती मानधनाला धक्का, शेवटच्या क्षणी टीम इंडियातून बाहेर, वर्ल्ड रेकॉर्डची संधी हुकली!

Last Updated:

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याचं रेकॉर्ड अखेर अबाधित राहिलं आहे. भारतीय महिला टीमची उपकर्णधार स्मृती मानधनाला गिलचा विक्रम मोडण्यासाठी 62 रनची गरज होती.

स्मृती मानधनाला धक्का, शेवटच्या क्षणी टीम इंडियातून बाहेर, वर्ल्ड रेकॉर्डची संधी हुकली!
स्मृती मानधनाला धक्का, शेवटच्या क्षणी टीम इंडियातून बाहेर, वर्ल्ड रेकॉर्डची संधी हुकली!
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याचं रेकॉर्ड अखेर अबाधित राहिलं आहे. भारतीय महिला टीमची उपकर्णधार स्मृती मानधनाला गिलचा विक्रम मोडण्यासाठी 62 रनची गरज होती, पण श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात स्मृती मानधना मैदानातच उतरली नाही. 2025 या वर्षात शुभमन गिल हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय रन करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. गिलने या वर्षात तब्बल 1764 आंतरराष्ट्रीय रन केले. गिलचा हा विक्रम मोडण्यासाठी स्मृतीला 62 रन हवे होते, पण आता स्मृती वर्षाचा शेवटचा सामनाच खेळली नसल्यामुळे गिल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात स्मृती मानधनाला विश्रांती देण्यात आली आहे. तिच्याऐवजी 17 वर्षांच्या जी. कमलिनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. चौथ्या टी-20 सामन्यात स्मृतीने 80 रनची धमाकेदार खेळी केली, त्यामुळे तिला प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळाला, पण त्या सामन्याच्या शेवटच्या क्षणी स्मृतीला किरकोळ दुखापत झाली. टीम इंडियाने आधीच सीरिज जिंकली आहे, त्यामुळे टीम मॅनेजमेंटने कोणताही धोका पत्करला नाही आणि स्मृतीला विश्रांती दिली.
advertisement

जी. कमलिनी कोण आहे?

जी. कमलिनीने वर्षाच्या सुरूवातीला अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. 7 इनिंगमध्ये कमलिनीने 35.75 च्या सरासरीने 143 रन केल्या होत्या. मुंबई इंडियन्सने कमलिनीला 1.60 कोटींना लिलावात विकत घेतलं होतं, त्यानंतर कमलिनी पहिल्यांदाच चर्चेत आली. 18 फेब्रुवारी रोजी, WPL मध्ये खेळणारी सर्वात तरुण खेळाडू बनून कमलिनीने इतिहास रचला. फक्त 16 वर्षे आणि 213 दिवसांच्या वयात कमलिनीने मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केलं. कमलिनीच्या या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने WPL 2026 साठी तिला रिटेन केलं.
advertisement

स्मृती-रेणुकाला विश्रांती

स्मृती मानधना आणि रेणुका सिंग ठाकूरला श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. रेणुका सिंग ठाकूरच्या ऐवजी स्नेह राणाला संधी देण्यात आली आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन

शफाली वर्मा, जी कमलिनी, ऋचा घोष, हरमनप्रीत कौर, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, स्नेह राणा, वैष्णवी शर्मा, श्री चरणी, अरुंधती रेड्डी
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : स्मृती मानधनाला धक्का, शेवटच्या क्षणी टीम इंडियातून बाहेर, वर्ल्ड रेकॉर्डची संधी हुकली!
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement