Weather Alert : महाराष्ट्रावर संकट टळलं नाही, आता तडाखा बसणार, हवामान खात्याचा थेट अलर्ट

Last Updated:
उत्तर भारतातून येणारे थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय झाल्याने राज्यातील थंडी अधिक तीव्र झाली आहे. किमान तापमानात चढ-उतार होत असले तरी गारठा कायम असून सकाळच्या वेळी हवेतील गारवा अधिक जाणवत आहे.
1/7
उत्तर भारतातून येणारे थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय झाल्याने राज्यातील थंडी अधिक तीव्र झाली आहे. किमान तापमानात चढ-उतार होत असले तरी गारठा कायम असून सकाळच्या वेळी हवेतील गारवा अधिक जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांत किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याचं पाहायला मिळत आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी किमान 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी नागरिकांना थंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे. पाहुयात, 31 डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख शहरांतील हवामान अंदाज कसा राहील.

advertisement
2/7
मुंबईत 31 डिसेंबर रोजी धुक्यासह अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतकं राहणार असून सकाळी आणि रात्री थंडावा जाणवेल. कोकण विभागातील जिल्ह्यांतही काहीसा गारवा जाणवू शकतो.

3/7
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अद्याप कायम आहे. पुणे शहरात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. सकाळच्या वेळी धुक्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून वाहनचालकांनी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

4/7
मराठवाड्यातही थंडीचा जोर टिकून आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. तसेच मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांत काहीशी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रात गारठा अधिक तीव्र आहे. नाशिक येथे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 8 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. निफाड भागात तापमान 6 अंशांपर्यंत घसरल्याने सकाळच्या वेळी गारठा प्रकर्षाने जाणवत आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यांत तापमानात घट बघायला मिळत आहे.

6/7
विदर्भातही थंडी कायम असून नागपूर येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान एक अंकी पातळीवर नोंदवले जात आहे.

7/7
राज्यात किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करावा, आरोग्याची काळजी घ्यावी तसेच पहाटे आणि रात्री अनावश्यक बाहेर जाणं टाळावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement