Pune News : पुण्यातून एसटीने प्रवास करताय? मग सावधान! 'या' एका गोष्टीमुळे तुमचा प्रवास होऊ शकतो महागडा

Last Updated:

Pune Bus Theft : पुण्यातील एसटी बसस्थानकांत महिलांवरील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे आर्थिक धोका वाढला आहे.

News18
News18
पुणे :  राज्य शासनाने आतापर्यंत महिलांसाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यापैंकी एक म्हणजे महिलांना एस.टी. प्रवासात ५० टक्के सवलत आहे. ही योजना जाहीर केल्यानंतर एस.टी.मध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली होती.  परंतू ,. ही वाढ एकीकडे प्रवाशांना सोयीची वाटते तर दुसरीकडे सुरक्षिततेसंदर्भात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्वारगेट, शिवाजीनगर आणि ताकडेवाडी बसस्थानकांत महिलांवर होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. सध्या आठवड्यातून दोन-चार महत्त्वाच्या चोरीच्या घटना घडत आहेत. ज्यामुळे महिलांना प्रवासात आर्थिक फटका बसत आहे.
स्वारगेट आणि ताकडेवाडी या दोन प्रमुख बसस्थानकांमधून राज्य आणि राज्याबाहेरील गाड्यांची सतत ये-जा सुरु असते. त्यामुळे या बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी कायम राहते. त्यातच चोरटे या गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील साखळी, हॅंडबॅगमधील मोबाइल, पर्स किंवा अन्य मौल्यवान वस्तू चोरी करत आहेत आणि या चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महिलांना प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे खूप आव्हानात्मक झाले आहे.
advertisement
दररोज पुण्यातून एक हजाराहून अधिक गाड्या बाहेर जातात आणि बाहेरून पुण्यात येतात, ज्यामुळे एकूण रोज सुमारे एक लाख प्रवाशांची ये-जा होते. या प्रवाशांमधून एसटीकडे दरवर्षी सुमारे 1 कोटी ते 50 लाख रुपयांचा महसूल येतो. मात्र, या मोठ्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा सध्या अपुरी पडत आहे. प्रवाशांच्या गर्दीत सुरक्षेची कठोरता राखणे, चोरी प्रतिबंधक उपाय प्रभावी करणे ही मोठी आव्हाने उभी राहिली आहेत.
advertisement
पुण्यातील स्वारगेट आगारात साधारण 30 सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले आहेत. बसस्थानकांमध्ये पोलिसांचा फौजफाटा, सुरक्षा रक्षक आणि महिला सुरक्षा रक्षक तैनात असतात, तरीही चोरीच्या घटनांवर पूर्णतहा नियंत्रण ठेवणे शक्य झालेले नाही. यामुळे लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, एवढ्या सुरक्षा असतानाही चोरी कशी होते? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गर्दी आणि प्रवाशांचा सतत बदलणारा प्रवाह चोरट्यांसाठी मोठा फायदा ठरतो.
advertisement
दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्री यांसारख्या सणासुदीच्या काळात एसटी बसस्थानकांत गर्दी आणखी वाढते. त्यामुळे महिला प्रवाशांनी प्रवासात अधिक सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक ठरते. महिलांनी प्रवासादरम्यान मोठ्या रकमेसह पैशांची देवाणघेवाण टाळावी महत्त्वाच्या दस्तऐवजांची सुरक्षितता सुनिश्चित करावी
तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, प्रवासादरम्यान सर्वप्रथम महिलांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. मोबाइल, हॅंडबॅग, पर्स अशा वस्तू थेट हातात न धरता, बॅगेत ठेवाव्यात. गर्दीतून सावधगिरी बाळगणे, समोरच्या किंवा शेजारीच्या अज्ञात व्यक्तीकडे लक्ष ठेवणे, शक्य असल्यास प्रवास साथीदारासोबत बसणे, या सर्व उपायांनी चोरीच्या घटनांचा धोका कमी होऊ शकतो.
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुण्यातून एसटीने प्रवास करताय? मग सावधान! 'या' एका गोष्टीमुळे तुमचा प्रवास होऊ शकतो महागडा
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement