कृषी हवामान : शेतकऱ्यांवर आज पुन्हा पावसाचं संकट, २१ जिल्ह्यांना अलर्ट, पीक काढणी करतांना काय काळजी घ्यावी?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : राज्यातून मॉन्सून परतीसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असली, तरी अजूनही अनेक भागांत पावसाचा प्रभाव कायम आहे.
राज्यातून मॉन्सून परतीसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असली, तरी अजूनही अनेक भागांत पावसाचा प्रभाव कायम आहे. आज (७ ऑक्टोबर) उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या भागांसाठी ‘येलो अलर्ट’ (सतर्कतेचा इशारा) जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
advertisement
रविवारी (५ ऑक्टोबर) मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. सोमवारी (६ ऑक्टोबर) सकाळपर्यंतच्या २४ तासांत परभणी येथे राज्यातील उच्चांकी १२० मिमी पाऊस नोंदवण्यात आला. हवामान विभागाने सांगितले की, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली होती.
advertisement
advertisement
‘शक्ती’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी होणार पश्चिम-मध्य अरबी समुद्रात सक्रिय असलेले ‘शक्ती’ चक्रीवादळ आता हळूहळू कमजोर होऊ लागले आहे. या वादळाचे केंद्र गुजरातमधील नालियापासून ९६० किमी आणि द्वारकापासून ९४० किमी पश्चिमेकडे, तसेच ओमानच्या मसिराहपासून ३१० किमी पूर्वेकडे होते. ही प्रणाली पूर्वेकडे सरकत असून, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यांच्या दिशेने येताना ती हळूहळू निवळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
advertisement