Rohit Sharma ला कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर गौतम गंभीरच्या घरी जंगी सेलिब्रेशन, पाहा पार्टीमध्ये कोण कोण?

Last Updated:

Indian Cricket Team Party Celebration : भारतीय संघ दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे आणि त्यापूर्वी सर्वांना गंभीरच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करण्यात येईल.

Rohit sharma Remove as ODI Captain Gautam Gambhir
Rohit sharma Remove as ODI Captain Gautam Gambhir
Gautam Gambhir announce party At home : ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी बीसीसीआयने पुन्हा धक्कातंत्राचा वापर करत मोठे बदल केले. टीम इंडियाचा रेग्युलर वनडे कॅप्टन रोहित शर्मा याला हटवण्यात आलं असून शुभमन गिल त्याची जागा घेणार आहे. रोहित शर्मा याच्याऐवजी शुभमन गिल आता टीम इंडियाचा वनडे कॅप्टन असणार आहे. टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टीम इंडियाचा नवा महोरक्या निवडला गेला आहे. त्यात गौतम गंभीरची भूमिका देखील महत्त्वाची राहिली. अशातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम जाहीर झाल्यानंतर गंभीरच्या घरी पार्टी होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

घरी रात्री जेवणासाठी बोलवलं

भारतीय संघ दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे आणि त्यापूर्वी सर्वांना गंभीरच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करण्यात येईल. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला घरी रात्री जेवणासाठी बोलवलं आहे. सूत्रांनी स्पोर्ट्स तकला सांगितलं की, 8 ऑक्टोबर रोजी अरुण जेटली स्टेडियममध्ये होणाऱ्या सराव सत्रानंतर संपूर्ण संघ गंभीरच्या घरी जेवणासाठी जाईल. तुम्हाला आठवत असेल तर, रोहित शर्माला टेस्ट कॅप्टन्सीवरून हटण्याआधी गौतम गंभीरने शुभमनला डिनरला घरी बोलवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा रोहितला वनडे कॅप्टन्सीवरून काढल्यानंतर गंभीरच्या घरी पार्टी होणार आहे.
advertisement

दुसरा कसोटी सामना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आत्मविश्वासाने भरलेली असेल. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत एक डाव आणि 140 धावांनी विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर टीम इंडियाला आता दुसरा सामना जिंकावा लागेल किंवा ड्रॉ करावा लागेल.
advertisement

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India ODI Squad vs Australia)

शुभमन गिल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma ला कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर गौतम गंभीरच्या घरी जंगी सेलिब्रेशन, पाहा पार्टीमध्ये कोण कोण?
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement