Dombivli News : डोंबिवलीकरांनो तुमचा दैनंदिन मार्ग बदलणार! स्टेशनजवळील हे महत्त्वाचे रस्ते बंद, काय आहेत पर्यायी मार्ग?

Last Updated:

Dombivli Road Closure : डोंबिवली शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आजपासून शहरातील काही मुख्य रस्ते काही कालावधीसाठी बंद राहणार आहेत. जाणून घ्या कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा.

News18
News18
डोंबिवली : डोंबिवलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आजपासून डोंबिवली पूर्व भागातील लोकमान्य टिळक चौक (टिळक पुतळा) ते बापूसाहेब फडके रस्त्यादरम्यानचा टिळक रस्ता सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
एमएमआरडीए या कामासाठी आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले असून कामाच्या कालावधीत या मार्गावर कोणत्याही प्रकारची वाहन वाहतूक होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या रस्त्याचा वापर टाळावा आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे.
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्वेतील हा टिळक रस्ता हा अतिशय महत्वाचा आणि गर्दीचा मार्ग आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून होत असते. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी आणि आगामी काही वर्षांसाठी रस्त्याची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे काम हाती घेण्यात आले आहे.
advertisement
सदर रस्ता बंद ठेवण्यात येत असताना नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने पर्यायी रस्त्यांचे नियोजन केले आहे. फडके रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी गांधी रोड, पंडुरंग वाडी मार्ग तसेच खाडी पाडा रस्ता या पर्यायी मार्गांची सोय करण्यात आली आहे.
वाहनचालकांनी या काळात वाहतूक नियमांचे पालन करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी असेही आवाहन करण्यात आले आहे. रस्ते बांधकामाचे काम सुरळीत आणि वेळेत पूर्ण व्हावे यासाठी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे.
advertisement
रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात टिळक पुतळा ते बापूसाहेब फडके रोड या मार्गाचा सिमेंट काँक्रीट रस्ता तयार होईल. या काळात वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक फलक, दिशादर्शक बोर्ड, आणि चेतावणी चिन्हे लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी या कालावधीत संयम ठेवावा कारण रस्त्याच्या दुरुस्तीमुळे दीर्घकालीन सुविधा मिळणार आहेत.
एमएमआरडीएचे अभियंते आणि ठेकेदार यांच्याकडून कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून, ठरवलेल्या कालावधीत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कामाच्या प्रगतीबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल एमएमआरडीएने खेद व्यक्त करत प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Dombivli News : डोंबिवलीकरांनो तुमचा दैनंदिन मार्ग बदलणार! स्टेशनजवळील हे महत्त्वाचे रस्ते बंद, काय आहेत पर्यायी मार्ग?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement