नांदेड: प्रेमासाठी गाव सोडलं, वर्षभराने परतलेल्या प्रेमीयुगुलासोबत घडलं आक्रीत, लव्ह स्टोरीचा भयंकर अंत

Last Updated:

Crime in Nanded: नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. इथं प्रेमसंबंधाला कुटुंबीयांनी विरोध केल्याच्या कारणातून प्रेमीयुगुलांनी आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

News18
News18
मुजीब शेख प्रतिनिधी नांदेड: नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. इथं प्रेमसंबंधाला कुटुंबीयांनी विरोध केल्याच्या कारणातून प्रेमीयुगुलांनी आयुष्याचा भयावह शेवट केला आहे. हे जोडपं एक वर्षापूर्वी गावातून पळून गेलं होतं. वर्षभरानंतर दोघंही पुन्हा गावात परतले. पण कुटुंबीयांनी दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध केला. यातून नैराश्य आल्याने दोघांनी विष प्राशन करून जीवन संपवलं आहे.
गजानन गव्हाळे (वय- ३५) आणि उमा कपाटे (वय- ३०) असं आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचं नाव आहे. दोघंही हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण या गावातील रहिवासी होते. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. याच प्रेमसंबंधातून त्यांनी गावातून पळ काढला होता. पण आता वर्षभराने पुन्हा गावात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्यातील नात्याला विरोध केला. यातून प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय गजानन गव्हाळे आणि ३० वर्षीय उमा कपाटे दोघेही विवाहित होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्यात ओळख झाली. कालांतराने त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनाही सोबत राहायचं होतं. पण दोघंही विवाहित असल्याने त्यांच्या नात्याला विरोध होईल, याची कल्पना त्यांना आधीपासून होती. त्यामुळे दोघंही वर्षभरापूर्वी गावातून पळून गेले होते.
सोमवारी (०६ ऑक्टोबर) हे दोघे पुन्हा गावात परतले. मात्र, त्यांच्या या निर्णयाला आणि प्रेमसंबंधाला घरातील सदस्यांनी तीव्र विरोध केला. कुटुंबियांच्या विरोधानंतर, आपल्या प्रेमाला आता कोणताही आधार मिळणार नाही, या निराशेपोटी या दोघांनी टोकाचे पाऊल उचलले आणि विष प्राशन करून जीवन संपवले.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे चिंचगव्हाणवर शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
नांदेड: प्रेमासाठी गाव सोडलं, वर्षभराने परतलेल्या प्रेमीयुगुलासोबत घडलं आक्रीत, लव्ह स्टोरीचा भयंकर अंत
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement