Weather Alert: विजा कडाडणार, धो धो कोसळणार! मराठवाड्यावर पुन्हा संकट, संभाजीनगरसह या जिल्ह्याला अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असला तरी काही ठिकाणीक अचानक धो धो पाऊस होत आहे. आज पुन्हा 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
1/5
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच काही प्रमाणात पावसाने उघडीप घेतली असली तरी काही भागात पावसाचं धुमशान सुरूच आहे. आज, 7 ऑक्टोबर रोजी पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच काही प्रमाणात पावसाने उघडीप घेतली असली तरी काही भागात पावसाचे धुमशान सुरूच आहे. आज, 7 ऑक्टोबर रोजी पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. पुढील 24 तासानंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. पुढील 24 तासानंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
मराठवाड्यातील उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये कोणताही महत्त्वाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नसला, तरी बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील काही भागात वाऱ्याचा वेग आणि आर्द्रतेतील वाढ या परिस्थितीमुळे पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

4/5
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पावसाच्या सरींमुळे तापमानात किंचित घट नोंदवली गेली आहे. सकाळी आणि सायंकाळी थंडावा जाणवत असून दिवसभर ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा त्रास कमी झाला असून वातावरणात ओलसरपणा जाणवत आहे.

5/5
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवस मराठवाड्यात पाऊस अधूनमधून सुरू राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण कायम राहील आणि काही ठिकाणी विजांचा कडकडाटात पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळा वरून माहिती घ्यावी आणि आपल्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करावे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवस मराठवाड्यात पाऊस अधूनमधून सुरू राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण कायम राहील आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घ्यावी आणि आपल्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करावे.
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement