Mental Health : सतत मनात अविचार, नकारात्मक विचार येतात? 'ही' मुद्रा करा, काही क्षणांत मन होईल शांत
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to avoid negative thoughts : डोक्यात नकारात्मक विचार आणि अविचार याचे कारण टेन्शन, मानसिक थकवा किंवा डिप्रेशनदेखील असू शकते. मोबाईलच्या वापराने यामध्ये भर पडते. मात्र हे नकारात्मक विचार आणि अविचार आपण कमी करू शकतो.
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या काळात आपले शारीरिक त्रास तर वाढलेच आहेत, मात्र त्रास जास्त वाढले आहेत. त्यातही मोबाईलच्या अतिवापरामुळे आपली मनःशांती पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दिवसभर लॅपटॉपवर काम केल्यानंतर किंवा कोणतेही काम केल्यानंतर आपण सर्वात आधी मोबाईल हातात घेतो. त्याचा परिणाम नकळत आपल्या मेंदूवर होतो.
मोबाईलमध्ये हल्ली बहुतांश लोक केवळ रिल्स आणि शॉर्ट्स असे कमी वेळेचे असंख्य व्हिडीओ दिवसभरात पाहतात. आपण जे काही बघतो त्यावर आपला मेंदू काम करत असतो. जेव्हा आपण अशी भरमसाठ तर्कहीन माहिती मेंदूला देतो तेव्हा त्याला खूप माहितीवर काम करावे लागते आणि मग मेंदू लवकर थकतो. काहीवेळा याचे दुष्परिणाम असे होतात की, आपल्या डोक्यात नकारात्मक विचार आणि अविचार वाढतात.
advertisement
डोक्यात नकारात्मक विचार आणि अविचार याचे कारण टेन्शन, मानसिक थकवा किंवा डिप्रेशनदेखील असू शकते. मोबाईलच्या वापराने यामध्ये भर पडते. मात्र हे नकारात्मक विचार आणि अविचार आपण कमी करू शकतो. काही सोप्या उपायांनी तुम्हाला तुमची मनशांती परत मिळू शकते. फेसबुकवर Sakshi Desai यांनी याबद्दलचे उपाय सांगितले आहेत. ते अगदी सोपे आहेत आणि तुम्ही यांचा अवलंब नक्कीच करू शकता.
advertisement
ही मुद्रा आहे फायदेशीर..
नकारात्मक आणि अविचार घालवण्यासाठी तुम्ही कश्यप मुद्रा करू शकता. ही मुद्रा करण्यासाठी सर्वात आधी मंडी घालून बसा. आता दोन्ही हात पुढे घ्या. त्यानंतर करंगळी आणि करंगळीजवळचे बोट दुमडा आणि त्यावर अंगठाही दुमडा. नंतर त्यावर इतरही दोन बोटं दुमडा. अशी मुद्रा करून दोन्ही हात मांडीवर ठेऊन दीर्घ श्वास घेऊन सोडा. ही मुद्रा रोज फक्त 10-15 मिनिटं ही करा.
advertisement
ही मुद्रा रोज केल्याने मनावरचा ताण आणि चिंता कमी होते. आत्मविश्वास वाढतो, मन स्थित होतं, मानसिक शांतता मिळते, एकाग्रता आणि निर्णय क्षमता वाढते. या मुद्रेने मेंदूतील नकारात्मक विचार कमी होतात. सकारात्मक ऊर्जा वाढते, मेंदूमध्ये ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो.
नकारात्मक आणि अविचार घालवण्यासाठी काही इतर उपाय
- सर्वात पहिला उपाय म्हणजे, जेव्हा तुमच्या डोक्यात असे विचार येऊ लागतात. तेव्हा तुमचे लक्ष दुसरीकडे वाळवा. थोडक्यात दुसरा काहीतरी चांगला विचार करा. तुम्ही वाचन, चालायला जाणे, किंवा एखादा छंद जोपासणे अशा क्रियाही करू शकता.
advertisement
- जेव्हा डोक्यात नकारात्मक विचार येतात तेव्हा ते लिहून काढा. जे विचार तुम्हाला सतत त्रास देतात, त्यांच्यास्तही एका वही बनवा आणि त्यामध्ये ते लिहा. थोडक्यात तुमच्या वाहीकडे व्यक्त व्हा, जे वाटतंय ते सांगा. याने तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला बरं वाटेल.
- हे काम बऱ्याच लोकांना अवघड वाटतं मात्र याने तुम्हाला फायदाही खूप मिळतो. रोज दिवसातील 10-15 मिनिटं ध्यान म्हणजेच मेडिटेशन करा. यामुळे तुम्हाला विचारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तुमची मानसिक स्थिती सुधारते.
advertisement
- सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला शिका. आवर्जून काही सकारात्मक गोष्टी करा. रोज किमान 3 चांगल्या गोष्टी लिहा, ज्यांनी तुमच्या आयुष्यात आनंद येतो, सुख मिळते आणि ज्या गोष्टींसाठी साठी तुम्ही आभारी आहात.
- हा उपाय खूप फायदेशीर आणि महत्त्वाचा आहे. माणसाला वाईट परिस्थितीत कोणाचीतरी साथ हवी असते. त्यामुळे तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार आणि अविचार येत असतील तर त्याविषयी कोणाशी तरी बोला. विश्वासू व्यक्तीशी किंवा समुपदेशकाशी बोलणं फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 1:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mental Health : सतत मनात अविचार, नकारात्मक विचार येतात? 'ही' मुद्रा करा, काही क्षणांत मन होईल शांत








