Weather Alert: 24 तासांत बदलणार हवा, सोलापूरसह 3 जिल्ह्यांना झोडपणार, पश्चिम महाराष्ट्राला IMD चा अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. मंगळवारी पावसाने उघडीप घेतली असली तरी हवामान विभागाने पुन्हा अलर्ट जारी केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस होईल. आज कोणताही सतर्कतेचा इशारा नाही. मात्र, बुधवारी, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर तापमानात देखील सातत्याने चढ-उतार जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.







