तुमची ग्रामपंचायत कुठे किती खर्च करते? सरकारी निधी किती येतो? मोबाईलवर मिळवा संपूर्ण हिशोब

Last Updated:

E-GramSawaraj App : आता ग्रामपंचायतीच्या प्रत्येक खर्चाचा आणि विकासकामांचा तपशील ग्रामस्थांना घरबसल्या मोबाइलवरच पाहता येणार आहे.

gram panchayat
gram panchayat
मुंबई : आता ग्रामपंचायतीच्या प्रत्येक खर्चाचा आणि विकासकामांचा तपशील ग्रामस्थांना घरबसल्या मोबाइलवरच पाहता येणार आहे. शासनाने सुरू केलेल्या ‘ई-ग्रामस्वराज’ पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅपमुळे ग्रामपंचायतीतील निधीचा वापर किती पारदर्शकपणे होत आहे, हे जाणून घेणे अधिक सुलभ झाले आहे.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असून, गावातील प्रत्येक नागरिकाला आपल्या ग्रामपंचायतीचा आर्थिक अहवाल आणि विकास आराखडा पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
ग्रामपंचायतीचा खर्च, आता पारदर्शक
पूर्वी ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून मोठा निधी मिळत असला तरी, तो प्रत्यक्षात कोणत्या कामांसाठी वापरला जातो हे ग्रामस्थांना समजणे कठीण होत असे. यासाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेकडे धाव घ्यावी लागे. मात्र आता, ‘ई-ग्रामस्वराज’ पोर्टलमुळे ग्रामस्थांना ही सर्व माहिती थेट त्यांच्या मोबाइलवर पाहता येते.
advertisement
या पोर्टलवर गावातील विकासकामांचे नाव, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, आणि कामाची सद्यस्थिती अशा सर्व तपशीलांसह माहिती उपलब्ध असते. त्यामुळे ग्रामस्थ सुरू असलेल्या कामांवर लक्ष ठेवू शकतात आणि निधीचा योग्य वापर झाला आहे का, याची थेट पडताळणी करू शकतात.
‘ई-ग्रामस्वराज’ अ‍ॅप वापरण्यासाठी कोणत्याही लॉग-इन किंवा पासवर्डची गरज नाही. ही माहिती सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध असून, ती कोणीही कधीही पाहू शकतो. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनणार आहे.
advertisement
अॅप कसा वापरायचा?
गुगल प्ले स्टोअरवरून ‘eGramSwaraj’ अ‍ॅप डाउनलोड करा.
अ‍ॅप उघडून ‘ग्रामपंचायत’ पर्याय निवडा.
त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतीचे नाव निवडा.
लगेचच गावातील खर्च, कामांची माहिती आणि ग्रामसभेचे निर्णय पाहता येतील.
पोर्टलवर उपलब्ध इतर माहिती
या पोर्टलवर केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे, तर ग्रामपंचायतीने तयार केलेला वार्षिक विकास आराखडा, ग्रामसभांतील निर्णय, गावाची लोकसंख्या, क्षेत्रफळ, निवडून आलेले सदस्य अशा अनेक माहितींचाही समावेश आहे. त्यामुळे हे अ‍ॅप ग्रामपंचायतीसाठी डिजिटल रेकॉर्ड म्हणून कार्य करणार आहे.
advertisement
ग्रामपंचायतीचा निधी कुठून येतो?
केंद्रीय आणि राज्य वित्त आयोगाचा निधी, जिल्हा नियोजन मंडळाचा निधी, विविध शासकीय योजनांचा विशेष निधी. घरपट्टी, पाणीपट्टी आणि स्थानिक करांमधून मिळणारे उत्पन्न
मराठी बातम्या/कृषी/
तुमची ग्रामपंचायत कुठे किती खर्च करते? सरकारी निधी किती येतो? मोबाईलवर मिळवा संपूर्ण हिशोब
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement