मोठी अपडेट! डोंबिवलीपासून ते छ. संभाजीनगरपर्यंत, या शहरांत पाणीपुरवठा राहणार बंद, सुरू कधी होणार?

Last Updated:

Water Cut : डोंबिवली, मुंबई शहर आणि संभाजी नगरमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे. पाणीसाठा कमी असल्यामुळे तसेच रखरखाव कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

News18
News18
मुंबई : डोंबिवली, मुंबई शहर आणि संभाजीनगर या भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे या भागांमध्ये ठराविक कालावधीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि पुरवठा सुरळीत होईपर्यंत संयम बाळगावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
डोंबिवली आणि ठाणेकरांसाठी महत्वाची सूचना
अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी गुरुत्व वाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे येत्या गुरुवार 9 ऑक्टोबर रात्री 12 ते शुक्रवार 10 ऑक्टोबर रात्री 12 या 24 तासांच्या कालावधीत डोंबिवली, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दरम्यान, ठाण्यातील इंदिरानगर, श्रीनगर, रूपादेवी, रामनगर, वारलीपाडा, कैलासनगर आणि येऊर वायुदल परिसरातही अमृत 2.0 योजनेअंतर्गत जुन्या पायपांचे तोडकाम आणि पंप पॅनल बदलण्याचे काम होणार आहे. त्यामुळे 7 ऑक्टोबर सकाळी 9 ते 8 ऑक्टोबर सकाळी 9 या कालावधीत 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. कामानंतर एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी येईल असे महापालिकेने कळवले आहे
advertisement
संभाजी नगरमध्येही पाणी कपात
छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील चार महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे अडचणीत आहे. मनपा प्रशासनाला सतत नवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मागील महिनाभर पाणीपुरवठा काहीसा सुरळीत असला तरी एमजेपीने केलेल्या शटडाऊनमुळे नागरिकांना पुन्हा आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळते असल्याची तक्रार आहे.
मुख्य विद्युत यंत्रणा दुरुस्तीमुळे मागील महिन्यात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नवीन पाणीपुरवठा योजनेची जोडणी करण्यासाठी मनपाने सहा दिवसांचा शटडाऊन दिला आहे, ज्यामुळे शहरातील पाणीपुरवठा 1 ते 3 दिवसांनी पुढे ढकलला जात आहे. परिणामी आधी सात-आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता 8-10 दिवसांनी मिळते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी अपडेट! डोंबिवलीपासून ते छ. संभाजीनगरपर्यंत, या शहरांत पाणीपुरवठा राहणार बंद, सुरू कधी होणार?
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement