एकीसाठी 8 हजार, ठाण्यात हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, दलाल महिलेला अटक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ठाणे शहरातील ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोठ्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दलाल महिलेला अटक केली आहे.
ठाणे: ठाणे शहरातील ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दलाल महिलेला अटक केली आहे. संबंधित महिला व्हॉट्सअॅपवरून तरुणींचे फोटो पाठवून मुलींचा सौदा करायची. तसेच त्यांना हॉटेलपर्यंत घेऊन जायची. या रॅकेटबाबत गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून महिलेला अटक केली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे.
रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचून अटक
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना ठाणे रेल्वेस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट चालत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. एक महिला देहविक्रीसाठी दोन तरुणींना घेऊन हॉटेलमध्ये येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचला.
८ हजार रुपयांना सौदा
advertisement
६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला होता. या दलाल महिलेने पोलिसांच्या बनावट ग्राहकांसोबत दोनपैकी एका पीडित महिलेचा सौदा आठ हजार रुपयांमध्ये निश्चित केला. यातील तीन हजार रुपये दलाल महिला पीडित महिलेला देणार होती. तर उर्वरित पाच हजार रुपये ती स्वतःकडे ठेवणार होती, अशी माहिती आरोपी महिलेने चौकशीत दिली.
advertisement
सापळा यशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या दलाल महिलेला ताब्यात घेतले आणि तिच्या तावडीतून दोन महिलांची सुटका केली. अटक करण्यात आलेल्या महिलेविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. मोबाईल आणि व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे ग्राहकांची आणि रॅकेटमधील इतर साथीदारांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 09, 2025 8:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
एकीसाठी 8 हजार, ठाण्यात हाय प्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, दलाल महिलेला अटक